शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
3
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
4
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
5
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
6
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
7
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
8
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
9
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
10
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
11
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
12
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
13
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
14
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
15
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
16
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
17
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
18
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
19
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
20
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत

कोल्हापूर जिल्ह्यात ‘लवकर या’च्या गजरात बाप्पांना निरोप--

By admin | Updated: September 10, 2014 00:29 IST

डॉल्बी, झांज, बेंजोचा निनाद, ढोल-ताशांच्या कडकडाटांवर ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन

भावपूर्ण वातावरणात जिल्ह्यात गणेशमूर्तींचे विसर्जन : डॉल्बीसह झांजपथक, बेंजोचा निनाद, ढोल-ताशांचा कडकडाटकोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा जयघोषात डॉल्बी, झांज, बेंजोचा निनाद, ढोल-ताशांच्या कडकडाटांवर ठेका धरणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उत्साहात जिल्ह्यात सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. सोमवारी सुरू झालेल्या मिरवणुका मंगळवारी सकाळीपर्यंत सुरू होत्या. पाऊस असूनही गणेशभक्तांनी बाप्पांना निरोप देण्यासाठी गर्दी केली होती.इचलकरंजी : इचलकरंजीत तब्बल २२ तास चाललेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत युवती आणि महिला वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सुमारे ५३७ गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला. सकाळी दहा वाजता शहर वाहतूक नियंत्रण कार्यालयापासून मानाच्या बिरदेव गणेशोत्सव मंडळाच्या पालखीचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून विसर्जन मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणुकीचा प्रारंभ गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राजाराम माने, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मदन कारंडे, नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, उपनगराध्यक्ष रणजित जाधव, उद्योगपती नितीन धूत यांच्यासह माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.विसर्जन मिरवणुकीवेळी काही मंडळांच्या महिलांनी भगवे फेटे परिधान करून मराठी बाणा जपल्याचे दिसत होते. कबनूरचा मानाचा गणेश या मंडळाची मिरवणूक अत्यंत शिस्तबद्धरीतीने काढली होती. यामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. मंडळाकडून सर्वच भक्तांना प्रसादाचे वाटप करण्यात येत होते. तसेच राजीव गांधी विद्यामंदिरच्या मिरवणुकीमध्ये व्यसनमुक्तीवर आधारित नाटक बसविण्यात आले होते. गतवेळच्या मिरवणुकीचा अनुभव लक्षात घेता यावेळी पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. विसर्जन मार्गावर विविध चौदा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. सहा टेहळणी पथके कार्यरत होती. वाद्यांच्या आवाजाची तीव्रता आणि मद्यप्राशन केलेल्यांच्या तपासणीसाठी दोन पथकांची नियुक्ती केली होती. नदीघाटावर मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी नगरपालिका तसेच आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावतीने क्रेनची सुविधा उपलब्ध केली होती. (प्रतिनिधी)यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत बहुतांशी मंडळांनी लहान-मोठ्या डॉल्बी लावल्या. आवाजाची मर्यादा तपासणारे यंत्र पोलिसांकडे होते. मात्र, आज, मंगळवारी सायंकाळपर्यंत कोणत्याही मंडळांवर अथवा डॉल्बीवर कारवाई करण्यात आल्याची नोंद पोलिसांत नव्हती. दरम्यान, यावर्षीही मुख्य मिरवणूक मार्गावर विविध पक्ष व संघटनांच्या किमान डझनभर स्वागत कमानी उभारल्या गेल्या होत्या. या विविध स्वागत कक्षांचे उद्घाटन गृहराज्यमंत्री पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. राधानगरीत दहा तास मिरवणूक  मध्यरात्रीपर्यंत चंदगडला मिरवणुकागारगोटीत ३२ मंडळांच्या बाप्पांचे विसर्जनकसबा बावड्यात जल्लोषात निरोपकागलमध्ये डॉल्बीला फाटा /////आजऱ्यात मनोरंजनाचे कार्यक्रम ठरले आकर्षणजयसिंगपूर, शिरोळमध्ये पारंपरिक पद्धतीने विसर्जन////////////गडहिंग्लजमध्ये १९ तास मिरवणुकामलकापुरात पहाटेपर्यंत मिरवणुकामलकापूर : मलकापूर परिसरातील सार्वजनिक गणेशमूर्तींचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन करण्यात आले. गणेश मंडळांच्या मिरवणुका पहाटे चार वाजेपर्यंत सुरू होत्या. यावर्षी गणेश मंडळांनी डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला होता.काल, सोमवारी दुपारी दोन वाजता सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुका सुरू झाल्या. मिरवणुकीसमोर बेंजो-बँड पथक, पारंपरिक ढोल-ताशा होता. काही मंडळांनी लाईट इफेक्टचा वापर केला होता. डॉल्बीला पूर्णपणे फाटा दिला होता. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती, तरीदेखील गणेशभक्तांचा उत्साह कमी झाला नव्हता. पहाटे चार वाजेपर्यंत मिरवणुका सुरू होत्या.