शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा माहिती कार्यालयाने शासनाची प्रतिमा उंचावली: वसंत भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 17:10 IST

कोल्हापूर : पत्रकारितेच्या बदलत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाने आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल आणि सुधारणा करून शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम ...

ठळक मुद्देजिल्हा माहिती कार्यालयाने शासनाची प्रतिमा उंचावली: वसंत भोसलेपूरस्थिती, निवडणुकीत काम केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कोल्हापूर : पत्रकारितेच्या बदलत्या काळात जिल्हा माहिती कार्यालयाने आपल्या कार्यपद्धतीत काळानुरूप बदल आणि सुधारणा करून शासनाची प्रतिमा उंचावण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी येथे केले. पत्रकारितेसाठी खऱ्या अर्थाने माहितीचा स्रोत बनण्याचे कामही या कार्यालयाने केल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हा माहिती कार्यालय येथे या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थिती आणि निवडणुकीच्या कामकाजामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, निवृत्त माहिती अधिकारी एस. आर. माने, माहिती साहाय्यक एकनाथ पोवार, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी संपादक भोसले यांच्या हस्ते अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.संपादक भोसले म्हणाले, शासकीय माहिती वस्तुनिष्ठ आणि जलद गतीने उपलब्ध करून देण्याचा जिल्हा माहिती कार्यालय हा स्रोत आहे. या विभागाने माहिती जलद गतीने देण्याबरोबरच माहितीची विश्वासार्हता जपली आहे. कमी मनुष्यबळाचा चांगला उपयोग करून शासनाची प्रतिमा जनमानसात उंचावण्याचा या कार्यालयाने केलेला प्रयत्न कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे.दिवसेंदिवस बदलणाऱ्या पत्रकारिता क्षेत्रातील उपक्रमांना आणि सुविधांना माहिती विभागाने आपलेसे करून, उपलब्ध मनुष्यबळात अविरतपणे काम करून पत्रकारांना तसेच प्रसारमाध्यमांना विस्तृत माहिती देण्यासाठी या कार्यालयाने चालविलेले प्रयत्न ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाचे केलेले कौतुक हा जिल्हा माहिती कार्यालयाचा उपक्रम स्तुत्य आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवून या विभागाने खऱ्या अर्थाने उत्तम जनसंपर्क सांभाळण्याचे कामही सुरू ठेवले आहे.एस. आर. माने यांनी या उपक्रमाबद्दल माहिती दिली. प्रशांत सातपुते यांनी प्रास्ताविक केले. एकनाथ पोवार यांनी आभार मानले. यावेळी माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Information & broadcasting ministryमाहिती व प्रसारण मंत्रालयkolhapurकोल्हापूर