शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सूडबुद्धीनेच जिल्हा बॅँकेची फेरचौकशी

By admin | Updated: September 22, 2015 01:08 IST

हसन मुश्रीफ यांचा आरोप : सुनावणीआधीच न्यायाधीशांचा निकाल; फुंडकरांना राज्य बॅँकेच्या चौकशीत अडकविले

कोल्हापूर : जिल्हा बॅँकेच्या माजी संचालकांवर ‘८८’ अतंर्गत एकीकडे सुनावणी आहे म्हणायचे आणि दुसरीकडे फेरचौकशी लावण्याची घोषणा करायची, सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे नेमके काय चालले हेच कळत नसून, केवळ राजकीय सूडबुद्धीने बॅँकेची फेरचौकशी लावण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप बॅँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. फेरचौकशीची घोषणा करून सुनावणी आधीच न्यायाधीशांनी (मंत्री पाटील) निकाल दिल्याचा टोलाही त्यांनी हाणला. आमदार मुश्रीफ म्हणाले, मंत्री हे अर्धन्यायिक न्यायाधीश असतात, त्यांनी एखाद्या चौकशीबाबत बोलताना फार सावधानता पाळणे गरजेचे असते; पण चौकशी अधिकाऱ्याने दबावाखाली चौकशी केल्याने न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे ‘८८’ अंतर्गत सुनावणीची प्रक्रिया सुरू असताना जिल्हा बॅँकेची फेरचौकशी करण्याची घोषणा मंत्री पाटील यांनी केली. सुनावणी आधीच निकाल देऊन पुढची कार्यवाही करणे कोणत्या कायद्यात बसते. मंत्री पाटील यांच्या या वक्तव्यांचा आम्हाला न्यायालयात निश्चित उपयोग होईल. जिल्हा बॅँकेत मी सापडत नाही म्हटल्यावर राज्य बॅँकेत तरी सापडतो का? म्हणून मंत्री पाटील यांनी राज्य बॅँकेची चौकशी लावली असावी, असे मला वाटते; पण त्यांनी काळजी करू नये, राज्य बॅँकेच्या एकाही मिटिंगला हजर नसल्याने माझ्यावर जबाबदारी निश्चित होऊच शकत नाही. या चौकशीबाबत दुसरी शंका अशी आहे, बुलढाणा जिल्ह्णातील भाजपचे ज्येष्ठ नेते व स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक पांडुरंग फुंडकर हे राज्य बॅँकेच्या संचालक मंडळात होते. या जिल्ह्णात मंत्रिपदासाठी फुंडकर की आमदार चैनसुख संचैती यांच्यात स्पर्धा सुरू आहे. फुंडकर यांचा मंत्रिमंडळातील पत्ता कापण्यासाठी त्यांना राज्य बॅँकेच्या चौकशीत अडकून पाडण्याचा डाव असू शकतो, असेही मुश्रीफ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)महाडिकांमुळेच दादांच्या पोटात गोळाशिवाजी चौकातील कार्यक्रमात ‘८८’च्या कारवाईतून कोणाला सोडणार नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले; पण यावेळी त्यांच्या शेजारी महादेवराव महाडिक होते, तेही या कारवाईत आहेत. कदाचित त्यांना पाहूनच दादांच्या पोटात गोळा उठला असेल. महाडिकांनी त्यांना ‘महादेवा’चा प्रसाद द्यावा, असा टोला मुश्रीफ यांनी हाणला. मग रावळ चांगले कसे?जिल्हा बॅँकेची चौकशी तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सचिन रावळ यांनी केली होती; पण मंत्री पाटील यांच्या मते ही चौकशी दबावाखाली केल्याने नीट होऊ शकली नाही. चौकशीत त्रुटी ठेवल्या, त्या रावळ यांना प्रादेशिक साखर सहसंचालक म्हणून त्यांनी आणले कसे? दादांना आवडले म्हणूनच त्यांना येथे आणले, असा आम्ही अर्थ काढायचा का? असेही मुश्रीफ यांनी विचारणा केली. फुरफुरणे, आडवे करतो अशी भाषा दादांनाच जमते, मी सुसंस्कृत माणूस आहे, असा टोला हाणत गेले वर्षभर त्यांनी सुडाच्या राजकारणातच वेळ घालविला आहे. नशिबाने त्यांना मोठी खाती मिळाल्याने त्यांनी आता विधानपरिषदेवर न येता कोल्हापूर शहरातून आमदार व्हावे, त्यासाठी माझ्या शुभेच्छा असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.