शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेची विक्रमी नफ्याकडे वाटचाल, सहा महिन्यांत १५० कोटींचा ढोबळ नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 15:23 IST

kolhapurnews, zilhabank, bankingsector, कोल्हापूर जिल्हा बँकेची वाटचाल विक्रमी नफ्याकडे सुरू असून, पहिल्या सहा महिन्यांत तब्बल १५० कोटींपर्यंत ढोबळ नफा पोहोचला आहे. ऐन कोरोनाच्या काळातही बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केल्याने मार्चपर्यंत बँकेच्या इतिहासातील विक्रमी नफ्याची नोंद होण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपहिल्या सहा महिन्यांत १५० कोटींचा ढोबळ नफा मार्चपर्यंत निव्वळ नफा १०० कोटी पार करणार

राजाराम लोंढेकोल्हापूर : जिल्हा बँकेची वाटचाल विक्रमी नफ्याकडे सुरू असून, पहिल्या सहा महिन्यांत तब्बल १५० कोटींपर्यंत ढोबळ नफा पोहोचला आहे. ऐन कोरोनाच्या काळातही बँकेचे संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन काम केल्याने मार्चपर्यंत बँकेच्या इतिहासातील विक्रमी नफ्याची नोंद होण्याची शक्यता आहे.शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांची बँक म्हणून जिल्हा बँकांकडे पाहिले जाते. बँक वर्षाला सरासरी १३०० कोटी पीक कर्जाचे वाटप करते. नाबार्ड यातील निम्मे कर्ज सवलतीच्या दराने देत असल्याने बँकेला मोठा आर्थिक फटका बसतो. तरीही बँकेने गेल्या पाच वर्षांत नेत्रदीपक प्रगती केली आहे.

प्रशासकीय कारकिर्द गेल्यानंतर बँकेचे अध्यक्ष, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह संचालक मंडळाने बँकेच्या कामकाजाला कमालीची शिस्त लावली. नोटाबंदीमुळे बँकेची आर्थिक घडी विस्कटते की काय, असे असताना मोठ्या खुबीने संचालक मंडळाने त्या परिस्थितीवर मात करीत बँकेला नफ्यात आणले. गेल्या हंगामात (२०१९-२०) मध्ये बँकेचा नफा राज्यात आघाडीवर राहिला.या (२०२०-२१) या आर्थिक वर्षाची सुरुवातच कोरोनाच्या संकटाने झाली. तीन महिने लॉकडाऊनमुळे बँकिंग क्षेत्रावर परिणाम झाला. संकटातही संधी शोधण्याचा प्रयत्न बँकेच्या व्यवस्थापनाने केल्याने सप्टेंबरअखेर तब्बल सहा हजार कोटी ठेवींचा, तर ४५०० कोटी कर्जाचा टप्पा पार केला.

पहिल्या सहा महिन्यांत बँकेचा ढोबळ नफा १५० कोटी आहे. मार्च २०२१ पर्यंत २०० कोटींच्या वर ढोबळ नफा जाऊन निव्वळ नफा १०० कोटींपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. बँकेच्या इतिहासातील हा विक्रमी नफा असेल.वसुलीमुळेच नफा शक्यसहा महिन्यांत कर्जे वाढली तरी कर्मचाऱ्यांनी ताकदीने वसुली यंत्रणा राबविली. विशेष म्हणजे साखर कारखान्यांचे दर महिन्याला व्याज मिळत गेल्यानेच नफा वाढल्याचे जाणकारांचे मत आहे.दृष्टिक्षेपात बँकआर्थिक वर्ष       ठेव                         कर्ज                        ढोबळ नफा           निव्वळ नफा

  • मार्च २०२०         ५७४१.३९ कोटी     ४१०९.७८ कोटी          १३०.७७ कोटी          ३७.७३ कोटी
  • सप्टेंबर २०२०        ६०९८ कोटी            ४५०० कोटी           १५० कोटी -
टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर