शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

जिल्ह्यात २५४ नव्या तलाठी सज्जांंची भर

By admin | Updated: May 19, 2017 01:01 IST

प्रशासनाची तयारी : लवकरच ठिकाणांची निश्चिती होणार; नवी पदे भरणार

प्रवीण देसाई । लोकमत न्यूज नेटवर्क  कोल्हापूर : झपाट्याने वाढत चाललेले नागरीकरण व लोकसंख्येचा विचार करून महसूल यंत्रणेचे काम गतीने व लोकाभिमुख होण्यासाठी सरकारने तलाठी सज्जे वाढवून या ठिकाणी पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने २५४ सज्जे होणार असून, तितकीच तलाठ्यांची पदे भरावी लागणार आहेत. यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्राथमिक स्तरावर तयारी सुरू झाली आहे.दिवसेंदिवस नागरीकरण वाढत चालले असले तरी महसूल विभागातील तलाठी सज्ज्यांमध्ये वाढ झालेली नाही. परिणामी याचा ताण सध्याच्या तलाठ्यांवर पडत असल्याचे दिसत आहे. यासाठी नवीन सज्जांच्या पुनर्रचनेसाठी सरकारतर्फे नागपूर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींना मान्यता देऊन नवीन सज्जे करून यासाठी तलाठ्यांची पदे चार वर्षांत टप्प्याटप्प्याने भरण्याचा निर्णय घेण्यात आला.यासाठी नेमलेल्या समितीने खातेदारांची संख्या, क्षेत्र (हेक्टरमध्ये), जमीन महसूल, लोकसंख्या, गावे या निकषांवर गुणांद्वारे जिल्ह्यातील नवीन सज्जांची संख्या निश्चित केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम सुरू होते. त्यानुसार जिल्ह्यात २५४ तलाठी सज्जे होणार असून, तितकीच पदे भरावी लागणार आहेत. सध्या जिल्ह्यात ४६३ सज्जे आहेत. नवीन तलाठी सज्जांमुळे सध्याच्या सज्जांमधील काही गावे कमी होणार आहेत. यामुळे तलाठ्यांचा भार थोडा हलका होईल. नवीन सज्जांची संख्या निश्चित झाली असली तरी त्यांची ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही येणाऱ्या काळात होणार आहे. सद्य:स्थितीला राज्य शासनाने नवीन सज्जांसाठी मान्यता दिली असली तरी याचा शासन निर्णय झालेला नाही. या निर्णयानंतर शासनाच्या मार्गदर्शक सूचना आल्यावर पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हा प्रशासनातील सूत्रांकडून सांगण्यात आले.तालुकामहसूलतलाठी सज्जेतलाठी सज्जे मंडळे(सध्याचे)(नवीन)करवीर११६२३५गगनबावडा०२०९०७पन्हाळा०७४० २०शाहूवाडी०६४१२१चंदगड०६३७ ३१गडहिंग्लज०७४३२५राधानगरी०६३८२३कागल०७५१ ०९आजरा०४२६०५भुदरगड०५३३१५शिरोळ ०७३९१७हातकणंगले०८४४४६७६४६३२५४नवीन तलाठी सज्जांमुळे तलाठ्यांचा भार थोडा हलका होणार