कोल्हापूर : रिलायन्स फाउंडेशन व राॅबिनवूड आर्मीच्या वतीने ‘लोकमत’च्या शहरातील पाचशेहूून जास्त वृत्तपत्र विक्रेत्यांना गुरुवारी सकाळी रिलायन्स फाउंडेशनचे प्रसाद सोनुले यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. ‘लोकमत’च्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. वृत्तपत्र विक्रेतेबांधवही खरे कोविड योद्धे असून कोरोना संसर्गाचा धोका पत्करून ते वाचकांच्या घरी रोज ‘लोकमत’ पोहोचवत आहेत.
कोरोना संसर्गाच्या काळात जिवावर बेतून काम करणाऱ्या जिल्ह्यातील फ्रंटलाईन कोविड योद्धांना रिलायन्स फाउंडेशन व राॅबिनवूड आर्मी यांच्यावतीने सुमारे १ लाख ५० हजार मास्कचे वाटप करण्यात आले आहे. त्यात गुरुवारी सकाळी ‘लोकमत’च्या भाऊसिंगजी रोड, राजारामपुरी, संभाजीनगर, कावळानाका परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्यांनाही मास्क वाटप करण्यात आले. यावेळी लोकमतचे सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संजय पाटील यांच्यासह वितरण विभागातील अधिकारी, कर्मचारी व वृत्तपत्र विक्रेते बांधव उपस्थित होते.
फोटो : २७०५२०२१-कोल-राॅबिनवूड आर्मी
आेळी : कोल्हापूर शहरातील ‘लोकमत’च्या विक्रेत्यांना गुरुवारी रिलायन्स फाउंडेशन व राॅबिनवूड आर्मीतर्फे प्रसाद सोनुले यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. या वेळी ‘लोकमत’चे सहायक सरव्यवस्थापक संजय पाटील व अंकविक्रेते उपस्थित होते.