पेठवडगाव : मिशन संवेदनांर्गत वडगाव व हद्दीतील २०० कष्टकरी, मजुरांना लोकसहभागातून अन्नधान्यांचे किट पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी वाटप केले.
वडगाव पोलिसांनी सामाजिक उपक्रम राबवत महिन्याचा किराणा गरजूंना दिला आहे. यासाठी लोकसहभागातून २०० किट उपलब्ध केली होती. यामध्ये तांदूळ, आटा, साखर, तूरडाळ, चहापूड, खाद्यतेल, हळद, जिरे, तीळ, चटणी यांचा समावेश होता. वडगाव परिसरातील हातावर पोट असलेल्या मजूर, रस्त्यांच्या कामावर असलेले कामगार, कष्टकरी कारागीर यांना मदतीचा हात देत आधार दिला.
३० वडगाव पोलीस
फोटो कॅप्शन:
पेठवडगाव : वडगाव पोलिसांच्या वतीने मिशन संवेदनांर्गत २०० अन्नधान्य किट वाटप करताना पोलीस निरीक्षक संतोष घोळवे छाया : संतोष माळवदे