शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यात पाच लाख रेशन कार्डधारकांना धान्य वाटप;: मोफत तांदळाचे ३२ हजार क्विंटल वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 10:35 IST

जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शंभर टक्के वाटप होेण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे या योजनेतील १२ हजार ४०० मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे

कोल्हापूर : जिल्ह्यातील रेशन दुकानांमधून सोमवारपर्यंत ५ लाख १ हजार ३०० रेशन कार्डधारकांना धान्य वाटप करण्यात आले आहे. तर मोफत तांदळाचेही तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल वितरण झाले आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल, मे व जूनचे रेशनवरील धान्य लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी तीन महिन्यांचे मिळून ३६ हजार टन गहू, तांदूळ जिल्ह्यासाठी मंजूर झाले आहे. यातील एप्रिलच्या १२ हजार धान्याचे वाटप हे १ एप्रिलपासून सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील १६०१ दुकानांमधून ‘अंत्योदय’ व ‘प्राधान्य’ कार्डधारकांना याचे वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील एकूण ५ लाख ५७ हजार रेशन कार्डधारकांपैकी ५ लाख १ हजार ३०० कार्डधारकांना आतापर्यंत धान्य देण्यात आले असून, हे प्रमाण ९० टक्के इतके आहे. येत्या तीन ते चार दिवसांत शंभर टक्के वाटप होेण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत रेशनवर एप्रिल ते जूनपर्यंत प्रतिलाभार्थी प्रती महिना पाच किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. या योजनेतील १२ हजार ४०० मेट्रिक टन तांदूळ जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. त्याचे तीन दिवसांपासून वाटप सुरू झाले असून, आतापर्यंत ३२ हजार क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.‘प्राधान्य’ कार्डधारकांना ५ किलो धान्यसध्या रेशनवर अंत्योदय कार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू व ३ रुपये किलो दराने तांदूळ असे ३५ किलो धान्य वितरित केले जात आहे. उर्वरित प्राधान्यक्रमामध्ये असलेल्या केशरी कार्डधारकांना प्रतिव्यक्ती २ रुपये किलो दराने ३ किलो गहू व २ रुपये किलो दराने २ किलो तांदूळ वितरण होत आहे.

 

जिल्ह्यातील सुमारे ९० टक्के प्राधान्य व अंत्योदय कार्डधारकांना रेशनवरील धान्याचे वाटप झाले आहे. तर तीन दिवसांत ३२ हजार क्विंटल मोफत तांदूळ वितरित करण्यात आला आहे.-दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरGovernmentसरकार