जोतिबा डोंगर येथील द्वारका हॉटेलमधील अलगीकरणामधील रुग्णांना अल्पोपाहार देण्यात आला. येथे असणाऱ्या रुग्णांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला. त्यांच्यासाठी चहा, बिस्कीट व अल्पोपाहारची सोय केली. नवनाथ लादे यांनी सांगितले की, जोपर्यंत हे सेंटर चालू राहील, तोपर्यंत आमच्या उत्कर्ष समितीतर्फे रोज चहा, नाष्टा, बिस्कीट ही सेवा रुग्णांना दिली जाणार आहे. याचबरोबर सॅनिटायझर' , युज आणि थ्रो पत्रावळी, द्रोण व ग्लासदेखील देऊ केले. द्वारका हॉटेलचे मालक योगेश भारती, समितीचे सचिव दत्तात्रय धडेल, ‘दुर्घटनेच्या आधी उपाय’ ग्रुपचे सदस्य दीपक शिंगे उपस्थित होते. या उपक्रमास सदस्य संदीप दादर्णे, अनिल मिटके, सुनील बुणे, गजानन फुटाणे यांचे सहकार्य लाभले. छोटासा हात खारूताईचा, प्रयत्न माणुसकी जपण्याचा उपक्रम राबविल्याबद्दल जोतिबा उत्कर्ष समितीचे ग्रामस्थांमधून त्यांचे कौतुक झाले.
कोरोना रुग्णांना अल्पोपाहार वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST