शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

Kolhapur: शिक्षकाची शिक्षणाधिकारी कार्यालयात होते 'शिकार'; पैशाच्या मागणीमुळे शिक्षक हैराण

By पोपट केशव पवार | Updated: December 8, 2023 13:47 IST

सध्या राज्यभर चर्चेत असलेला शिक्षण विभागातील भ्रष्टाचार अन् भ्रष्टाचाऱ्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. यात माध्यमिक शिक्षण ...

सध्या राज्यभर चर्चेत असलेला शिक्षण विभागातील भ्रष्टाचार अन् भ्रष्टाचाऱ्यांची संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झाले आहेत. यात माध्यमिक शिक्षण विभागही मागे नाही. या विभागात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 'कर्तबगार' मंडळी कशी लुटतात... कशा-कशाला पैसे द्यावे लागतात, हे सांगणारी ही वृत्तमालिका आजपासून..पोपट पवारकोल्हापूर : शिक्षण विभागातील किरण लोहार, तुकाराम सुपे व विष्णू कांबळे यांच्या लाचखोरीच्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची चर्चा जोरकसपणे सुरू आहे. माध्यमिक शिक्षण विभागात तर काेणताच कारभार 'हलका' नाही. टेबलावर 'जड' वस्तू ठेवल्याशिवाय कागद पुढे सरकतच नसल्याचे चित्र आहे.माध्यमिक शिक्षण विभागात नवा शिक्षक म्हणजे त्यांची हातची शिकार. ती वाया जाऊ द्यायची नाही, हे ठरवूनच त्यानुसार जाळे टाकले जाते. आधीच नोकरीसाठी हेलपाटे मारून थकलेला, संस्थाचालकांच्या तुंबड्या भरून नोकरी मिळवलेला शिक्षकही आपसुकच या कार्यालयाची शिकार बनतो. त्यामुळे या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी दिवसेंदिवस गब्बर होत आहेत.

नव्या मान्यतेसाठी ४ ते ७ लाख रुपयांचा दरहायस्कूलमध्ये नवीन शिक्षकाची भरती करायची असेल तर त्याला शिक्षणाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक आहे. ही मान्यता मिळवण्यासाठी या कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याच्या पंटरकडून ४ ते ७ लाख रुपये घेतले जातात. विशेष म्हणजे संस्थाचालक व शिक्षणाधिकारी कार्यालय यांचे संगनमत असल्याने यातूनच ही रक्कम ठरविली जाते. त्यामुळे शिक्षकालाही ऐन मोक्याच्या वेळी ही रक्कम नाकारणे परवडणारे नसते. कागल तालुक्यातील एका शिक्षकाने तर नोकरीच्या आशेचा 'किरण' ऐनवेळी मिटायला नको म्हणून ही मान्यता मिळवण्यासाठी घरातील सर्व जनावरे विकून संबंधित अधिकाऱ्याच्या तुंबड्या भरल्या होत्या !

कशाकशाला द्यावे लागतात पैसेनवीन शिक्षकांना मान्यता, वैद्यकीय बिले मंजूर करणे, वरिष्ठ वेतनश्रेणी मान्यता, मुख्याध्यापक पदोन्नती.

सगळ्यांसाठी 'किरण'कोल्हापुरात माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून काम केलेला एक वादग्रस्त अधिकारी कधीकाळी सर्व शिक्षकांसाठी तारणहार होता. त्यांच्या कार्यालयात आलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्याला थेट साहेबांच्या केबिनमध्ये पाठवले जायचे. विषय किरकोळ असो की कठीण, साहेब तो चुटकीसरशी मार्गी लावण्याचे आश्वासन देत; पण, त्याआधी ठरवून दिलेल्या व्यक्तीबरोबर बोलणी करण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. त्यानुसार तो विषय निकाली निघायचा.

वेतनश्रेणीसाठीही द्यावे लागतात पैसेशिक्षकांची १२ वर्षांतून एकदा वेतनश्रेणी बदलते. या वेतनश्रेणीच्या प्रस्तावाला एरवी सहा-सहा महिने लागतात. त्यासाठी शिक्षकांना वारंवार हेलपाटे मारावे लागतात. त्यासाठी नियमांवर बोट ठेवले जाते. प्रस्तावात असंख्य त्रुटी काढल्या जातात. मात्र, यासाठी टेबलाखालून व्यवहार झाल्यास १५ दिवसांत हे प्रकरण निकाली काढले जात असल्याचे एका शिक्षकाने सांगितले.

त्यांचा असाही अनुभवशाळा अनुदानावर आणण्यासाठी पूर्वी पैसे मागितले जात होते. मात्र, सध्या वरिष्ठ वेतनश्रेणी, अनुदानाचा पुढचा टप्पा देण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात एकही रुपया द्यावा लागत नसल्याचे एका शिक्षकाने सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducation Sectorशिक्षण क्षेत्रBribe Caseलाच प्रकरण