शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

Kolhapur Politics: संघर्षाच्या शापाचे कागलकरांना चटके, मुश्रीफ-घाटगे वादाने पुन्हा अशांतता 

By राजाराम लोंढे | Updated: February 27, 2023 19:03 IST

संघर्षाला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची किनार

राजाराम लोंढेकोल्हापूर : कागलला राजकीय संघर्ष नवीन नसला, तरी गेल्या आठ वर्षांपासून मंडलीक-मुश्रीफ यांच्यातील वाद शांत झाल्याने कागलकर गुण्यागोविंदाने नांदताना दिसत होते. मात्र, आता मुश्रीफ-घाटगे यांच्यात राजकीय संघर्ष कागलमध्ये उफाळला आहे. या संघर्षाला आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांची किनार असून, काँग्रेस, राष्ट्रवादीची शक्तिस्थळे असलेल्या ‘केडीसीसी’ बँक व ‘गोकुळ’वर विरोधकांनी हल्ले करण्यास सुरुवात केल्याने नजीकच्या काळात वार-प्रतिवाराचे राजकारण नव्याने पेट घेणार, हे निश्चित आहे.स्वर्गीय श्रीपतराव बोंद्रे, रत्नाप्पाण्णा कुंभार, उदयसिंगराव गायकवाड, बाळासाहेब माने यांच्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कागल तालुकाच राहिला. स्वर्गीय सदाशिवराव मंडलीक यांनी जवळपास पंधरा वर्षे नेतृत्व केले. त्यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांच्याकडे नेतृत्व आले, यासाठी जिल्हा बँकेची सत्ता हे जरी कारणीभूत असले, तरी जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे तयार करण्याची ताकद या नेत्यांकडे होतीच, त्याचबरोबर कोणत्याही पातळीवर संघर्षाची तयारी होती. जिल्ह्यातील नेत्यांसोबत लढाई करत असतानाच, कागलमधील विरोधकांशीही त्यांना लढावे लागले. त्यातूनच स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे व सदाशिवराव मंडलीक यांच्यातील संघर्ष संपूर्ण जिल्ह्याने पाहिला आहे. त्यानंतर, मंडलीक व हसन मुश्रीफ यांच्यातील संघर्ष टोकाला गेला होता, आठ वर्षे या संघर्षात कागलच्या सामान्य जनतेला अनेक वेळा चटके सोसावे लागले. मुश्रीफ व संजय घाटगे यांच्यातील संघर्षही सर्वांनी पाहिला आहे. २०१५ च्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुश्रीफ यांनी संजय मंडलीक यांना पॅनलमध्ये घेऊन विरोधाची धार कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पुन्हा मंडलीक, मुश्रीफांनी समझोत्याचे राजकारण सुरू ठेवत जिल्ह्याचे नेतृत्व आपल्या हातून सुटू दिले नाही. दहा वर्षे मुश्रीफ यांच्यासोबत असणारे समरजीत घाटगे यांनी २०१९ ला त्यांच्याविरोधात लढले. पराभव झाल्यापासून ते नेटाने कामाला लागले, येथपर्यंत ठीक होते. आता नव्याने घाटगे-मुश्रीफ यांच्यात संघर्ष सुरू झाला असून, यातून तयार झालेल्या ठिणगीचा वणवा पेटला, तर यामध्ये कागलातील सामान्य कार्यकर्ते होरपळून निघणार आहेत.जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार नाही, त्यांची सल आहे. ती कोणत्याही राजकीय पक्षांना असतेच. मात्र, त्यासाठी वाटेल ते करण्याच्या वृत्तीने सध्या सामान्य माणसात मात्र अस्वस्थता दिसत आहे. आगामी लोकसभा व विधानसभेला यश मिळवायचे असेल, तर हसन मुश्रीफ व सतेज पाटील या शक्तिस्थळांवर हल्ले केले पाहिजे, हे साधे गणित भाजपचे आहे. यातूनच मुश्रीफ यांना घेरले आहे. ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण लावून सतेज पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधकांचा आहे.

राजकीय संघर्षात शेतकऱ्यांचे नुकसान नको‘केडीसीसी’ बँक व ‘गोकुळ’ हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अर्थवाहिन्या आहेत. या दोन्ही संस्थांच्या भोवती जरी जिल्ह्याचे राजकारण फिरत असले, तरी राजकीय संघर्षात या संस्थांच्या अस्तित्वाला धक्का लागला, तर शेतकरी रस्त्यावर येण्यास वेळ लागणार नाही.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरkagal-acकागलPoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफSamarjitsinh Ghatgeसमरजितसिंह घाटगे