शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
6
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
7
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
8
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
9
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
10
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
11
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
12
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
13
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
14
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
15
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
16
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
17
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
18
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी

प्रदर्शनामुळे तंत्रज्ञान बांधापर्यंत

By admin | Updated: February 3, 2015 23:58 IST

अजित पवार : भीमा कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाचा समारोप

कोल्हापूर : कृषी प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहे. यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असून शेतकऱ्यांना त्याचा उपयोग होत आहे, असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी येथे केले.मेरी वेदर ग्राउंड मैदानावर आयोजित चार दिवसीय भीमा कृषी, पशु व पक्षी प्रदर्शनाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी अजित पवार यांच्या हस्ते संजिवनी अ‍ॅग्रो फळे व फुले खरेदी-विक्री केंद्र (तमदलगे, ता. शिरोळ) यांना ‘भीमा कृषिरत्न पुरस्कार’ व द्राक्षगुरु वसंतराव माळी (पलूस, जि. सांगली) यांना ‘भीमा कृषी जीवनगौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.अजित पवार म्हणाले, काही लोक स्वार्थासाठी अशी प्रदर्शने भरवितात; परंतु खासदार धनंजय महाडिक यांनी सामाजिक भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून कृषी प्रदर्शन सुरू ठेवले आहे. सध्या शेतीकामासाठी मजूर मिळेनात, अशी स्थिती आहे. ती कमतरता भरून काढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांनी करून घेत त्याचा उपयोग केल्यास मजुरांअभावी काम थांबण्याची वेळ येणार नाही. शेतीला भरपूर पाणी दिले जायचे; परंतु हे चित्र आता बदलू लागले आहे. आता ठिबक सिंचनाच्या वापरामुळे पाण्याची बचत होऊ लागली असून त्याचा वापर शेतीसाठी दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अशा प्रकारची कृषी प्रदर्शन ही काळाची गरज बनली आहेत. यामधून अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचत असून त्याचा लाभदेखील आता दिसत आहे. आपला शेतकरीदेखील हायटेक होत असल्याचे हे चित्र आहे. भीमा कृषी प्रदर्शन त्याला पूरक काम करते. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून एकप्रकारे धनंजय महाडिक मार्केटिंग करत आहेत. त्यामुळे हे प्रदर्शन दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून आपण कृषी प्रदर्शन भरवत असून लाखो लोकांना त्याचा फायदा होत आहे. या माध्यमातून शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती लोकांना होत आहे.यावेळी आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार अमल महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष विमल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील, अरुंधती महाडिक, करवीर पंचायत समिती सदस्या अरुणिमा माने आदी उपस्थित होते. ताज मुलाणी यांनी सूत्रसंचालन केले. रामराजे कुपेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)कृषी व सहकार ही महाराष्ट्राची शक्तिस्थळेकृषी आणि सहकार ही महाराष्ट्राची शक्तिस्थळे आहेत. त्यामुळे राज्याची वाटचाल प्रगतिपथावर राहिली आहे. सरकार व्होडाफोनला ३२००कोटी रुपयांचा करमाफी देते; परंतु शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव देत नाही, हे कसले ‘अच्छे दिन’ अशा शब्दांत पवार यांनी यावेळी बोचरी टीका केली.