शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

सेंट्रल किचनबाबतच्या आदेशामुळे आचारसंहितेचा भंग, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:51 IST

आचासंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १५ मार्चला सेंट्रल किचनबाबतचा गोपनीय आदेश काढून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देसेंट्रल किचनबाबतच्या आदेशामुळे आचारसंहितेचा भंगजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

कोल्हापूर : आचासंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने १५ मार्चला सेंट्रल किचनबाबतचा गोपनीय आदेश काढून आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार कोल्हापूर जिल्हा शालेय पोषण आहार कामगार संघटनेने जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.या आदेशामुळे शालेय पोषण आहार बचतगट, स्वयंपाकी, मदतनीस यांच्यावर विपरित परिणाम होणार असून त्यांचे मिळकतीचे साधन काढून घेतले जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील १ लाखाहून अधिक महिलांचा रोजगार हिरावून घेतला जाणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील, कार्याध्यक्ष भगवान पाटील यांनी  दिली.या आदेशामुळे बचत गटांचे अस्तित्व नष्ट होणार आहे. ही योजना राबवत असताना गरीब,अल्पसंख्याक, दलित, विधवा, परितक्त्या, अविवाहित महिलांना काम मिळत असताना या नव्या आदेशामुळे महिलांचे सक्षमीकरण होण्याऐवजी त्यांचे खच्चीकरणच होणार असल्याचा आरोप करण्यात आला.केवळ बड्या धेंडांना उद्योग चालवता यावा म्हणून शासनाने हा निर्णय घेतला असून मुळात आचारसंहिता लागू झाली असताना अशा पद्धतीने काहीजणांचा आर्थिक लाभ होण्यासाठी गोपनीय पत्र काढण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय श्ािंदे यांना भेटून हे निवेदन दिल्याचे सांगण्यात आले. यावेळी सचिव अमोल नाईक, वर्षा कुलकर्णी, साधना पाटील, ललिता सावंत, शशिकला रायकर, दिनकर पाटील, पूनम बुकेट, महादेव फुटाणे, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

आधीच्या गुंतवणुकीचे काय?यापूर्वीही शासनाने किचन शेड, भांडी, गॅस यामध्ये निधीची गुंतवणूक केली आहे. या नव्या रचनेमुळे या सर्व गुंतवणुकीचे काय करणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर