शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आडात टाकले कीटकनाशक

By admin | Updated: April 30, 2015 00:25 IST

हिंगणगादेत प्रकार : ग्रामसेवक, शिपायाचे कृत्य; ग्रामस्थ आक्रमक

विटा : खानापूर तालुक्यातील हिंगणगादे येथील ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या सार्वजनिक आडात टीसीएलऐवजी बीएचसी कीटकनाशक पावडर टाकल्याने प्रचंड खळबळ उडाली. ग्रामसेवक एस. आर. तांबोळी यांच्या सांगण्यावरून शिपाई चंद्रकांत खवळे याने हे कृत्य केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. हा प्रकार लक्षात आला नसता, तर ग्रामस्थांसह जनावरांच्या जीवितासही धोका निर्माण झाला असता. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामसेवकास धारेवर धरले. दरम्यान, या प्रकारानंतर आडातील पाणी उपशाचे काम बुधवारी दिवसभर सुरू होते.हिंगणगादेच्या दक्षिणेस बंधाऱ्याजवळ पाणीपुरवठा करणारा सार्वजनिक आड आहे. या आडातून सुमारे दोन ते अडीच हजार लोकांना पाणीपुरवठा होतो. मंगळवारी दुपारी ग्रामसेवक तांबोळी व सरपंच पती नारायण कुंभार यांनी शिपाई चंद्रकांत खवळे याला आडाच्या पाण्यात टीसीएल पावडर टाकण्यास सांगितले. ग्रामपंचायत कार्यालयात गटारीवर टाकण्यासाठी बीएचसी कीटकनाशक पावडर व टीसीएल पावडर ठेवण्यात आली होती. मात्र, शिपाई नवीन असल्याने त्याला या दोन्ही पावडरमधील फरक लक्षात आला नाही. त्याने बीएचसी कीटकनाशकाचे २५ किलो पावडरचे पोते उचलून आडात टाकले. त्यामुळे पाण्यावर पावडरचा थर साचला. या प्रकाराने ग्रामस्थ संतप्त झाले. अखेर आडातील पाणी पूर्णपणे उपसून आड स्वच्छ करण्याचा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी नऊपासून पंपाव्दारे आडातील पाणी काढण्याचे काम सुरू होते. (वार्ताहर)शिपायावर कारवाई होणारहिंगणगादेचा शिपाई नवीन आहे. त्याला टीसीएल पावडर टाकण्यास सांगितले होते. परंतु, नजरचुकीने बीएचसी कीटकनाशक पावडर आडाच्या पाण्यात पडली. एक वाटी (२०० ग्रॅम) पावडर पाण्यात पडली होती. आडातील पाणी उपसा करण्याचे काम सुरू असून, यापुढे असा प्रकार घडू नये, याची दक्षता घेत आहोत. संबंधित शिपायावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामसेवक एस. आर. तांबोळी यांनी सांगितले.