शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळ ठरावाचे पैसे सभासदांना वाटल्याची चर्चा; पन्हाळा तालुक्यातील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 11:50 IST

GokulMilk Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ठरावधारक मतदारास आपल्याच आघाडीस मतदान करण्यासाठी मिळालेल्या रकमेचे त्या ठरावधारकाने दूध संस्थेच्या सभासदांना प्रत्येकी २५०० प्रमाणे वाटप केल्याच्या बातमीने बुधवारी जिल्ह्यात हवा उडवून दिली. रक्कम जरूर वाटली, परंतु ती दूध फरकाची असून कोरोना मदत म्हणून वाटली असल्याचे त्या ठरावधारकाने स्पष्टीकरण केले. लोकांचा मात्र त्यावर विश्वास बसला नाही. पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थेमध्ये ही घटना घडली.

ठळक मुद्देगोकुळ ठरावाचे पैसे सभासदांना वाटल्याची चर्चा; पन्हाळा तालुक्यातील प्रकार दूध फरक वाटल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीत ठरावधारक मतदारास आपल्याच आघाडीस मतदान करण्यासाठी मिळालेल्या रकमेचे त्या ठरावधारकाने दूध संस्थेच्या सभासदांना प्रत्येकी २५०० प्रमाणे वाटप केल्याच्या बातमीने बुधवारी जिल्ह्यात हवा उडवून दिली. रक्कम जरूर वाटली, परंतु ती दूध फरकाची असून कोरोना मदत म्हणून वाटली असल्याचे त्या ठरावधारकाने स्पष्टीकरण केले. लोकांचा मात्र त्यावर विश्वास बसला नाही. पन्हाळा तालुक्यातील दूध संस्थेमध्ये ही घटना घडली.

या संस्थेच्या ७५ सभासदांना त्या ठरावधारकाने प्रत्येकी २५०० रुपयांप्रमाणे ही रक्कम वाटप केल्याचा मेसेज दुपारी सोशल मीडियावर फोटोसह व्हायरल झाला. त्याच गावातील कुण्या तरुणाने तो व्हायरल केला. एकूण रकमेचा विचार केल्यास एक लाख ८७ हजार ५०० रुपये होतात. संघाच्या निवडणुकीत एकेक मतासाठी एवढी रक्कम शेवटच्या टप्प्यात देण्यात आली असल्याने त्याबद्दल जोरदार चर्चा झाली.कोणत्याही दूध संस्थेचा ठराव एका व्यक्तीच्या नावे असला तरी ती संस्था मोठी करण्यासाठी अनेकांचे हात लागलेले असतात. परंतु अनेक ठिकाणी ज्यांच्या नावावर ठराव, तोच वजीर ठरला व त्यानेच दोन्हीकडून मिळालेले पैसे खिशात घातल्याच्या तक्रारी आहेत.

ही रक्कम समान हप्त्यात सभासदांना वाटप करण्याचा फंडा एका गावात सुरू झाला तर तशी मागणी सगळीकडेच होऊ शकते, असे वाटल्यानेच घडलेला प्रकार दाबला गेल्याची चर्चा सुरू आहे. या पैशातील वाटा सर्वच सभासदांना मिळाल्यास मतदानाचा अधिकार नाही, किमान सत्तेचा तरी लाभ झाला, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने लोकमतकडे व्यक्त केली.

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर