शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

‘भेसळमुक्त मिसळ’वर चर्चा : राजकारण भेसळ करणारे खासदार निवडणुकीत हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 11:15 IST

व्यापारासह राजकारणात भेसळ करणाऱ्या भेसळखोर खासदारांनाच जनता या निवडणुकीत हद्दपार करेल, अशी टीकाच युवा सेनेच्या वतीने भेसळमुक्त मिसळवर युवकांनी केली.

ठळक मुद्दे‘भेसळमुक्त मिसळ’वर चर्चा : राजकारण भेसळ करणारे खासदार निवडणुकीत हद्दपारयुवा सेनेच्या वतीने दसरा चौकात ‘शिव मिसळ’ येथे चर्चा रंगली

कोल्हापूर : व्यापारासह राजकारणात भेसळ करणाऱ्या भेसळखोर खासदारांनाच जनता या निवडणुकीत हद्दपार करेल, अशी टीकाच युवा सेनेच्या वतीने भेसळमुक्त मिसळवर युवकांनी केली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेसळमुक्तमिसळवर युवकांची चर्चा ही युवा सेनेच्या वतीने हर्षल सुर्वे यांच्या संकल्पनेतून आली. दसरा चौकातील ‘शिव मिसळ’ येथे ही युवकांची चर्चा रंगली असताना अनेक युवकांनी आपली मते मांडली.

‘निवडणुकीपेक्षा विकासाचा दृष्टिकोन’, ‘रोजगारनिर्मिती’, ‘शैक्षणिक सवलती’, तसेच ‘शैक्षणिक विकास’ या विषयांवर चर्चा घडवून आणली. अनेकांनी चर्चेत सहभाग घेताना रोखठोक मते मांडली.युवा सेनेचे विस्तारक हर्षल सुर्वे म्हणाले, मिसळ-पे-चर्चा करताना ती भेसळ नव्हे, तर निष्ठावंतांची मिसळ आहे; पण हे खासदार व्यापारी बनून कोल्हापुरात आले अन् राज्यकर्ते बनले, ही प्रवृत्ती आज समाजाला दिशादर्शक नव्हे, तर घातक ठरत आहे.

राजकारणही भेसळ करणाऱ्या या व्यापारी प्रवृत्तीच्या खासदारांना जनताच निवडणुकीत हद्दपार करेल, अशीही टीका केली. गेल्या निवडणुकीत त्यांचा प्रचार करताना रॅलीसाठी एका कार्यकर्त्याने त्यांच्या पेट्रोलपंपवर २00 रुपयांचे पेट्रोल घातले; पण त्यानंतर हजार रुपये गाडी दुरुस्तीसाठी खर्च करण्याची पाळी त्याच्यावर आल्याचेही उदाहरण त्यांनी दिले.संदीप पाटील म्हणाले, रेल्वे, विमानतळ, बास्केट ब्रीज झाले म्हणतात; पण ते दिसत नाहीत. युवकांना नोकऱ्या कोठे निर्माण केल्या, खेळासाठी मैदाने कोठे उपलब्ध केलीत; त्यामुळे या मतदार संघातील युवकच त्यांचा या निवडणुकीत पराभव करतील.खासदारांची या मातीशी नाळ जुळलेली नाही, त्यांनी आपल्या उद्योगाला बळ मिळावे म्हणून राजकारणाचा आधार घेतला. ते विकास, शेती धोरणावर बोलत नाहीत; त्यामुळे मिसळ पे चर्चा करताना विद्यमान खासदारांनी टीका करण्यापेक्षा विकास कामांवर बोलावे, अशीही मते यावेळी काहींनी मांडली.चर्चेत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष मंजीत माने, सागर पाटील, उदय आळवेकर, श्रुतीकिर्ती सावंत, आदींनी सहभाग घेतला, तर राजू यादव, अवधूत साळोखे, आप्पा पुणेकर, शेखर बारटक्के, विनायक जाधव, चैतन्य अष्टेकर, कब्बू करोली, शीतल पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Electionनिवडणूकkolhapurकोल्हापूर