शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

घरफाळा थकबाकीदारांना दंडात सवलत

By admin | Updated: January 10, 2017 00:28 IST

शासनाचे निर्देश : चाळीस हजार मिळकतधारांना साडेपाच कोटींचा लाभ

कोल्हापूर : शहरातील घरफाळा थकबाकीदारांच्या दंडात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय आयुक्त स्तरावर घ्यावा, असे निर्देश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले. त्याची अंमलबजावणीची तयारी महानगर पालिका प्रशासनाने सुरू केली. यामुळे साडेपाच कोटींची सवलत शहरवासीयांना मिळेल, तर महापालिकेची साडेदहा कोटींची थकबाकी वसूल होणार आहे. महापालिका प्रशासनाने २०११-१२ पासून शहरात मूल्यावर आधारित घरफाळा आकारणी सुरू केली. तेव्हापासून थकबाकी रकमेवर वार्षिक १८ टक्के घरफाळा आकारण्यास सुरुवात केली. त्याबाबत शहरवासीयांत नाराजी असून, स्थायी समितीमध्येही त्याचे पडसाद उमटले. २०१४-१५ मध्ये तत्कालीन स्थायी सभापती सचिन चव्हाण यांनी सभेत दंडात पन्नास टक्के सवलत देण्याचा ठराव केला. त्यानंतर १८ फेब्रुवारी व ३१ मार्च २०१६ रोजी स्थायी समितीत, तर २० जुलै २०१६ रोजी महासभेत ठराव केले. पण, प्रशासनाने अंमलबजावणी केली नव्हती. आयुक्त पी. शिवशंकर यांनी हे ठराव तसेच आपला अहवाल नगरविकास विभागास पाठवून मार्गदर्शन मिळावे, अशी विनंती केली होती. त्याचवेळी आयुक्तांनी सांगली महापालिकेत अशी सवलत दिल्यानंतर लेखापरीक्षणात आक्षेप घेत ताशेरे ओढल्याचेही निदर्शनास आणले; पण थकबाकीदावरील दंडात सवलत देण्याचा निर्णय कायद्यानुसार आयुक्त स्तरावर घ्यावा, असे निर्देश नगर विकास विभागाने दिले. त्यामुळे आता शासनाच्या परवानगीची गरज भासणार नाही. (प्रतिनिधी)सतेज पाटील यांचे प्रयत्न..संबंधित ठरावाची अंमलबजावणी करावी म्हणून शासन स्तरावर आमदार सतेज पाटील व माजी सभापती सचिन चव्हाण यांनी प्रयत्न केले. त्यासाठी आमदार पाटील यांनी नगरविकास विभागाचे सचिव, उपसचिव यांच्या गाठीभेटी घेतल्या. आज, मंगळवारी स्थायी समितीची सभा होत आहे. जयश्री चव्हाण या सभागृहातील ठराव आणि शासनाने दिलेले निर्देशानुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी करणार आहेत. ‘लोकमत’मध्ये पहिले वृत्तकोल्हापुरातील घरफाळा थकबाकीदारांना त्यांच्यावर आकारलेल्या दंडाच्या रकमेत पन्नास टक्के सवलत मिळण्याची शक्यता आहे, अशा आशयाचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने १ जानेवारीला दिले होते.शासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, अशी सूचना केली आहे. त्यामुळे कायद्यातील तरतुदी आणि महानगरपालिकेचे हित पाहून लवकरच निर्णय घेतला जाईल. -पी. शिवशंकर, आयुक्त