शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीच्या नार्को तपासणीबाबत आज खुलासा

By admin | Updated: February 10, 2015 00:31 IST

उज्ज्वल निकम : खटल्याच्या सुनावणीस प्रारंभ; मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर : शाळकरी मुलगा दर्शन शहा खून प्रकरणाच्या सुनावणीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्या न्यायालयात सोमवारपासून सुरुवात झाली. संशयित आरोपी योगेश ऊर्फ चारू आनंदा चांदणे याचे वकील पीटर बारदस्कर यांनी चांदणेची नार्को तपासणी करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. तो अर्ज निकाली काढून खटला चालविण्यात यावा, अशी विनंती केली आहे. त्यावर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आरोपीने नार्को तपासणीसाठी केलेल्या अर्जाची नक्कल मागवून घेतली आहे. त्यावर आज, मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार खुलासा सादर करणार असल्याचे सांगितले. पंचवीस तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या खंडणीसाठी दि. २६ डिसेंबर २०१२ रोजी देवकर पाणंद येथील दर्शन रोहित शहा या शाळकरी मुलाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला होता. या खटल्याच्या सुनावणीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. आर. मुळे यांच्या न्यायालयात सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रारंभ झाला. विशेष सरकारी वकील निकम यांनी आरोपीने मी खटला चालवू नये यासाठी माझ्याविरोधात दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. खटल्यातील सहा साक्षीदार उपस्थित असून सुनावणीला सुरुवात करावी, अशी विनंती केली. त्यावर आरोपीचे वकील बारदस्कर यांनी आरोपी चांदणे याने स्वत:ची नार्को तपासणी करावी, असा विनंती अर्ज न्यायालयात सादर केला आहे. तो अर्ज पहिल्यांदा निकाली काढावा, त्यानंतर सुनावणीला सुरुवात करावी, अशी विनंती केली. त्यावर अ‍ॅड. निकम यांनी आक्षेप घेत नार्को तपासणी हा काही पुरावा होऊ शकत नाही, त्यामुळे खटल्याची सुनावणी सुरू करावी, असा युक्तिवाद मांडला. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून न्यायाधीश मुळे यांनी अ‍ॅड. निकम यांना आरोपीने नार्को तपासणीसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत आपला खुलासा सादर करावा, त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. न्यायालयाच्या निर्णयानुसार अ‍ॅड. निकम हे मंगळवारी खुलासा सादर करणार आहेत. चांदणे याची नार्को तपासणी करायची की नाही, या अंतिम निर्णयानंतर मुख्य खटल्याच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे. यावेळी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.चांदणेला ताकीद संशयित आरोपी चारू चांदणे याने यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान साक्षीदारास धमकाविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी त्याच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याप्रकरणी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला पुन्हा असा प्रकार घडता कामा नये, अशी ताकीद दिली असल्याचे तपासी अधिकारी यशवंत केडगे यांनी दिली.