शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्याला शिस्त लावणार-अध्यक्ष महेश जाधव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:59 IST

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता निघणाºया पालखी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी देवस्थानच्यावतीने नियोजन

ठळक मुद्दे विद्युत रोषणाईचे उद्घाटन घटस्थापनेदिवशी सायंकाळी करण्यात येणार देवीची उत्सवमूर्ती महासरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवली होती. देवस्थान समिती : अंबाबाईच्या गाभाºयाची स्वच्छता पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता निघणाºया पालखी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी देवस्थानच्यावतीने नियोजन करण्यात येत आहे. याबाबतची बैठक शनिवारी समितीच्या कार्यालयात झाली. दरम्यान, करवीरनिवासिनीश्री अंबाबाईच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. यानिमित्त वर्षातून एकदा देवीच्या अंगावर इरलं पांघरण्याची पद्धत आहे. भाविकांच्या सोयीसाठी देवीची उत्सवमूर्ती महासरस्वती मंदिराजवळ दर्शनासाठी ठेवली होती. सायंकाळी सातनंतर देवीचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात आले.नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून अंबाबाईच्या मंदिराची स्वच्छता सुरू आहे. अखेरच्या टप्प्यात शनिवारी देवीच्या मुख्य गाभाºयाची स्वच्छता करण्यात आली. सकाळचा अभिषेक झाल्यानंतर देवीच्या मूळ मूर्तीला इरले पांघरण्यात आले. या काळात भाविकांना देवीचे दर्शन मिळावे यासाठी उत्सवमूर्ती सरस्वती मंदिराजवळ ठेवण्यात आली. दिवसभर स्वच्छता संपल्यानंतर सायंकाळी सात वाजता अभिषेक, सालंकृत पूजा व अभिषेकानंतर देवीची मूर्ती दर्शनासाठी पूर्ववत खुली करण्यात आली.

नवरात्रौत्सवात रोज रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची पालखी विविध आकारांत काढली जाते. या काळात भाविकांची संख्या जास्त असल्याने ढकलाढकली, धक्काबुक्कीचे प्रकार घडतात. शिवाय स्वयंघोषित पाहुणे आणि कार्यकर्त्यांची संख्या खूप असते. यंदा मात्र या पालखी सोहळ्याला शिस्त लावण्यासाठी देवस्थान समिती प्रयत्नशील असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.याशिवाय मंदिराला करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन घटस्थापनेदिवशी सायंकाळी करण्यात येणार आहे.उद्या पोलीस, पुजाºयांची बैठकनवरात्रौत्सवाच्या नियोजनासाठी उद्या, सोमवारी पोलीस प्रशासन, महापालिका, महावितरण अशा विविध विभागांची बैठक सकाळी साडेअकरा वाजता देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात होणार आहे. दुपारी एक वाजता श्रीपूजकांनी नवरात्रौत्सवाचे केलेले नियोजन, देवीच्या विविध रूपांतील पूजा, पुजाºयांनी पाळावयाच्या सूचना यासंबंधीची बैठक होईल.सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणीदरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रौत्सवात अंबाबाई मंदिराच्या परिसरात सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. या नऊ दिवसांत सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत तब्बल ५१ संस्थांचे कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय भवानी मंडपातदेखील सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले असून, त्यासंबंधी संस्थांशी बोलणी झाली आहेत.