शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकावे : एआयएसएफची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 12:21 IST

नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आॅलइंडिया स्टुडंटस फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.

ठळक मुद्दे अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकावे एआयएसएफची मागणी

कोल्हापूर : नागपूर विद्यापीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासाचा पदव्युत्तर अभ्यासक्रमात समावेश केला आहे. या प्रकारामुळे संविधानातील धर्मनिरपेक्षता मान्य नसलेल्या संघाचे बाळकडू विद्यार्थ्यांना दिले जाणार असून, ते घातक आहे. त्यामुळे बी. ए.च्या अभ्यासक्रमातून संघाचे प्रकरण काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आॅलइंडिया स्टुडंटस फेडरेशनच्यावतीने करण्यात आली.फेडरेशनतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे, की भाजप सरकारचा शिक्षणाचे धार्मिकीकरण आणि खाजगीकरण करण्यावर जोर आहे. देश स्वातंत्र्याच्या लढ्यात कम्युनिस्टांचे मोलाचे योगदान होते. उलट संघाचे नेते क्रांतिकारकांना पकडून देण्यात आघाडीवर होते.

स्वातंत्र्यानंतर आरएसएस आणि हिंदू महासभेने ‘काळा दिन’ पाळला होता. अजूनही संघ आपल्या कार्यालयावर देशाचा झेंडा फडकवत नाही; मात्र देशविरोधी कार्य करणाऱ्या व महात्मा गांधींच्या हत्येशी संबंध असलेल्या या संघटनेच्या इतिहासाचा अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय नागपूर विद्यापीठाने घेतला आहे.

बी. ए. अभ्यासक्रमात ‘संघाचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान’ या प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे. हा प्रकार म्हणजे शिक्षणाचे संघीकरण करण्याचे षङयंत्र आहे. यानंतर मनुस्मृतीदेखील विद्यापीठात आदर्श रचना म्हणून शिकविण्याचे दिवस दूर नाहीत, तरी अभ्यासक्रमातील संघाचा आशय व पुस्तक मागे घेण्यात यावे, अन्यथा देशभर नागपूर विद्यापीठ व सरकारविरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल. यावेळी राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य गिरीश फोंडे, प्रशांत आंबी, हरीश कांबळे, आरती रेडेकर, धीरज कठारे, योगेश कसबे, सुनील कोळी उपस्थित होते.

 

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघkolhapurकोल्हापूर