शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’ पतसंस्थेत अपहार

By admin | Updated: January 22, 2017 00:57 IST

शनिवार पेठ शाखेत प्रकार : व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

एकनाथ पाटील --कोल्हापूर -शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे लेखापरीक्षणात उघडकीस आले आहे. याप्रकरणी लेखापरीक्षक श्री. दानी यांनी शुक्रवारी (दि. २०) दिलेल्या फिर्यादीनुसार लक्ष्मीपुरी पोलिसांनी शाखा व्यवस्थापक संशयित वामन गुळवणी याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल केला. या गैरव्यवहारात काही बड्या धेंड्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले, भोगावती नागरी सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय शाहूनगर येथे आहे. कोल्हापुरात शनिवार पेठ येथे तिची शाखा आहे. या शाखेचे १९९३ ते २०१५ या कालावधीचे लेखापरीक्षण श्री. दानी यांनी केले. यावेळी संस्थेमध्ये सुमारे ४५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. दानी यांनी संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यावर हे प्रकरण मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. काही राजकीय नेत्यांनीही प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मध्यस्थी केली; परंतु लेखापरीक्षक दानी यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली. गुन्हा दाखल होणार याची चाहूल लागताच पतसंस्थेतील काही बड्या धेंड्यांनी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तानाजी सावंत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या एका माजी अध्यक्षाने या पतसंस्थेबरोबरच गृहनिर्माण संस्था स्थापन केली. त्यांच्या निधनानंतर या दोन्ही संस्था बुडीत गेल्याने त्यावर काही वर्षांपूर्वी प्रशासक नेमले. शाहूनगर-परिते येथील मुख्य शाखा सध्या बंद आहे. शनिवार पेठेतील शाखेचे कामकाज सुरू आहे. येथील लेखापरीक्षणानंतर हा गैरव्यवहार उघडकीस आला.या गैरव्यवहारात शाखा व्यवस्थापकासह काही कर्मचारी व संचालकांचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीमध्ये निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक केली जाईल. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक दादा पवार अधिक तपास करीत आहेत. भोगावती नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये गैरव्यहार झाला आहे. त्यासंबंधी गुन्हा दाखल आहे. संशयित आरोपी पसार होतील म्हणून त्यांची नावे गोपनीय ठेवली आहेत. - तानाजी सावंत : पोलिस निरीक्षक लेखाव्यवस्थापकांनी दिली ४५ लाख अपहाराची पोलिसांत तक्रारगैरव्यवहारात काही बड्या धेंड्यांसह कर्मचाऱ्यांचाही समावेशपतसंस्थेतील बड्या धेंड्यांचा पोलिस अधिकाऱ्यांवर दबावाचा प्रयत्न