अस्वस्थतेचे ‘अर्थ’कारण महानगरपालिकेचे राजकारण : पदं वाटताना वशिलेबाजीचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 01:30 AM2018-02-14T01:30:41+5:302018-02-14T01:30:58+5:30

Disagreements 'meaning' because the politics of municipal corporation: Vandalism objections | अस्वस्थतेचे ‘अर्थ’कारण महानगरपालिकेचे राजकारण : पदं वाटताना वशिलेबाजीचा आक्षेप

अस्वस्थतेचे ‘अर्थ’कारण महानगरपालिकेचे राजकारण : पदं वाटताना वशिलेबाजीचा आक्षेप

Next

भारत चव्हाण ।

कोल्हापूर : सर्वसामान्य नगरसेवकांना गृहीत धरून चालण्याची नेत्यांची मानसिकता, मूठभर कारभाºयांची ‘आंबे’ पाडण्यासाठी सुरू असणारी धडपड, आघाडीतील नगरसेवकांना सोबत घेऊन जाण्यात गटनेते तसेच सभागृह नेत्यांचे अपयश, पदे वाटताना मर्जीतील लोकांना दिली जाणारी पसंती, चार सदस्य असलेल्या शिवसेना नगरसेवकांची होणारी मनधरणी आणि सतत जाणविणारी आर्थिक विवंचना यामुळे काँग्रेस-राष्ट्वादी काँग्रेसमध्ये वर्षभरापासून धुसफूस सुरू असून, त्याचा परिपाक सोमवारी स्थायी समिती सभापतिपद गमाविण्यात झाला.

काँग्रेस-राष्ट्वादी च्या नेत्यांनी जर आपल्या वृत्तीत तातडीने बदल करून सर्वांना विश्वास दिला नाही, तर मे महिन्यात होणाºया महापौर-उपमहापौर निवडणुकीतसुद्धा गोंधळ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षांपासून विविध कारणांनी काँग्रेस व राष्ट्वादी तील अनेक नगरसेवक नाराज आहेत. या नाराजीचा लाभ उठविण्याकरिता विरोधी गटाशी हातमिळवणी करून काही व्यावसायिक ‘कारभारी नगरसेवक’ लाभ उठवत आहेत. नेते मात्र अशा ‘कारभाºयां’वरच विसंबून राहत असल्यामुळे नेते आणि नगरसेवक यांच्यातील समन्वयाचा अभाव निर्माण झाला आहे. ‘पक्षाच्या चिन्हावर निवडून आलाय, जातोय कुठं’ ही कारभाºयांची मानसिकता आघाडी फुटीला कारणीभूत ठरत आहे.

काँग्रेस-राष्टÑवादीतील धुसफूस ही पदं वाटपात होणारी वशिलेबाजी तर आहेच, शिवाय वेगवेगळ्या कामांत होत असलेल्या आर्थिक उलाढालीदेखील आहेत. स्थायी समिती सभापतींसह ठरावीक कारभाºयांनी एखादे काम आणायचं आणि त्यात तोडपाणी करायचे. कोट्यवधींचा मलिदा मोजक्या तीन-चार लोकांनी वाटून घ्यायचा आणि बाकीच्यांना फक्त गाजरे दाखवायची; ही वृत्ती बळावली आहे. मिळाल्याचा जेवढा आनंद होत नाही त्यापेक्षा जास्त दु:ख न मिळाल्याचे आहे. काही दिवसांपूर्वी असंतुष्टांनी निनावी पत्राद्वारे कोणी किती मिळविले याचे आकडेच जाहीर केले होते.


आत्महत्येची भाषा
निवडणूक लढविताना काही नगरसेवकांनी हातउसने, तर काहींनी कर्जे काढली आहेत. कोणी दागिने विकले, तर कोणी घरे गहाण ठेवून पैसे घेतले, निवडणूक लढले आहेत. इतका सगळा खर्च करून निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत काही मिळत नाही, उलट काही ठराविक जणच हात मारत आहेत म्हटल्यावर अनेकांतून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. एका नगरसेवकाने तर ‘मला संधी मिळाली नाही तर आत्महत्याच करतो,’ अशी भाषा सहकाºयांजवळ व्यक्त केली होती. हा नगरसेवक सध्या कर्जबाजारी आहे.

आत्महत्येची भाषा
निवडणूक लढविताना काही नगरसेवकांनी हातउसने, तर काहींनी कर्जे काढली आहेत. कोणी दागिने विकले, तर कोणी घरे गहाण ठेवून पैसे घेतले, निवडणूक लढले आहेत. इतका सगळा खर्च करून निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत काही मिळत नाही, उलट काही ठराविक जणच हात मारत आहेत म्हटल्यावर अनेकांतून उघडपणे नाराजी व्यक्त होत आहे. एका नगरसेवकाने तर ‘मला संधी मिळाली नाही तर आत्महत्याच करतो,’ अशी भाषा सहकाºयांजवळ व्यक्त केली होती. हा नगरसेवक सध्या कर्जबाजारी आहे.


घर जाळून कोळशाचा व्यापार
नगरसेवक म्हणजे प्रतिष्ठेचे पद; पण या खोट्या प्रतिष्ठेसाठी महानगरपालिकेतील अनेक नगरसेवक कर्ज काढून निवडणूक लढले. निवडून आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत त्यांना चांगलाच पश्चात्ताप झालाय. इथं काही ठराविकांनाच पैसे मिळत आहेत. सर्वसामान्य नगरसेवकांना काहीच मिळत नाही याची खात्री त्यांना पटली आहे. ‘फुकटची हमाली आणि घर जाळून कोळशाचा व्यापार’ करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. त्यातूनच नगरसेवकांच्या मोठ्या समूहात अस्वस्थता आहे.


वाटी तो बोटं चाटी
मलिदा वाटपात जसा दुुजाभाव केला जातो, तसाच तो राज्य व कें द्र सरकारच्या निधीतही केला जातो, अशा तक्रारी आहेत. सरकारचा निधी सर्वांना समान देण्यात यावा, अशी मागणी केली जाते, परंतु काही ठरावीक पदाधिकारी त्यातील जादा निधी त्यांच्या भागाकडे वळवतात. दलितेतर निधी वाटपात असाच गदारोळ झाला. साडेतीन कोटींचा निधी काही पदाधिकारी घेणार आहेत, असं कळताच त्याची तक्रार झाली. खुद्द पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यातील ५० टक्के निधी स्थानिक आमदार सुचवतील त्या कामांवर खर्च करा, असे सांगावे लागले. गेले दोन वर्षे या निधीतून करायच्या कामांचा घोळ सुरू आहे.

Web Title: Disagreements 'meaning' because the politics of municipal corporation: Vandalism objections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.