शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निधीच्या दुष्काळाचे ‘सावट’

By admin | Updated: March 25, 2016 00:38 IST

२८ कोटींचा अर्थसंकल्प : जिल्हा परिषदेच्या विकास योजनांना कात्री

कोल्हापूर : शासनाकडूनची देयके संपल्यामुळे आणि हक्काचे उत्पन्नाचे स्रोत नसल्याने येथील जिल्हा परिषदेच्या स्वनिधीचा केवळ २७ कोटी ९४ लाख ३९ हजार २०० रुपयांचा यंदाचा अर्थसंकल्प (बजेट) मंगळवारी (दि. २२) विशेष सभेत अर्थ समितीचे सभापती अभिजित तायशेटे यांनी सादर केला. अर्थसंकल्पावर निधीच्या दुष्काळाचे सावट राहिल्याने सर्वच विकास योजनांना कात्री लागली आहे. अध्यक्षा विमल पाटील अध्यक्षस्थानी होत्या. दुष्काळी परिस्थितीमुळे उद्ध्वस्त शेतकऱ्यांंना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने अर्थसंकल्पामध्ये बळिराजाला झुकते माप दिले. परंतु, मोठ्या प्रमाणात शेतीवर आधारित अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या ग्रामीण जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जिल्हा परिषदेने कृषी, पशुसंवर्धन विभागास तोकडी तरतूद करून बेदखल केले. अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी सदस्य परशराम तावरे यांनी याकडे लक्ष वेधले. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाच्या या अर्थसंकल्पात सर्वाधिक तरतूद शिक्षण, सार्वजनिक मालमत्तेचे परीक्षण करणे, पाणीपुरवठा व स्वच्छतेसाठी करण्यात आलेले आहे. सन १९७६-७७ ते २०११-१२ वर्षाअखेर शासनाकडून उपकर, प्रोत्साहन व सापेक्ष अनुदान, करातील ७५ कोटी ८१ लाख १० हजार ७०८ रुपये थकीत होते. त्यापैकी २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये ७१ कोटी २३ लाख ७३ हजार ८८० निधी मिळाला. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ यामध्ये उर्वरित देय असलेले सर्व ४ कोटी ५७ लाख ३६ हजार ८२५ रुपये मिळाले आहेत. या मिळालेल्या निधीचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेला मिळणारे मुद्रांक शुल्काचे २०१५-१६ साठीचे १० कोटी ३७ लाख ४० हजारांचे अनुदान शासनाकडून येणे होते. परंतु, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही येणेबाकीची रक्कम शासनाने थकीत बिलापोटी जीवन प्राधिकरणाकडे वर्ग केली. परिणामी जिल्हा परिषेदला यातील मिळणारे ३ कोटी ५४ लाख ८ हजार ८७७ अनुदान कमी झाले. इतके पैसे कमी झाल्यामुळे एकूण अंदाजपत्रकही कमी झाले आहे. सन २०१५-१६ मधील ठेवींवरील निव्वळ व्याज ११ कोटी ६ लाख रुपये व अन्य कर, उपकर यातून अर्थसंकल्प तयार करण्यात आला. अर्थसंकल्पावरील चर्चेत महेश पाटील यांनी प्रशासकीय साहित्यावरील खर्च कमी करण्याची सूचना केली. ग्रामीण भागातील मुलींसाठी एमएससीआयटी या संगणक अभ्यासक्रमासाठी तरतूदची, अशी मागणी बाजीराव पाटील यांनी केली. अर्जुन आबिटकर, राजेंद्र परीट, अरुण इंगवले, सुजाता पाटील, मेघाराणी जाधव, सावकर मादनाईक, विकास कांबळे, हिंदुराव चौगले, उमेश आपटे यांनी विविध सूचना मांडल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार, लेखाधिकारी गणेश देशपांडे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली. सभापती ज्योती पाटील, सीमा पाटील, किरण कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी) कमी आर्थिक तरतुदीमुळे नाराजीगेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या सभागृहात उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यावर चर्चा होते; परंतु पदाधिकाऱ्यांकडे इच्छाशक्ती नसल्याने ठोस उपाय झालेले नाहीत. त्यामुळे यावर्षी इतक्या कमी रकमेचे अंदाजपत्रक मांडण्याची नामुष्की आल्याची टीका धैर्यशील माने, संजय मंडलिक यांनी केली. सर्वच सदस्यांनी या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली. आर्थिक तरतूद कमी असल्यामुळे गेल्या वर्षाच्या अनेक चांगल्या नावीन्यपूर्ण योजनांवर केलेली तरतूद रद्द केली आहे, असेही माने यांनी निदर्शनास आणले.उपोषण करणार...जोतिबाला मोठ्या संख्येने भाविक येतात; त्यामुळे तेथे मूलभूत सेवा, सुविधा निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदेने निधी द्यावा, अन्यथा मी एकटी तरी का असेना, उपोषण करणार असल्याचे भाग्यश्री पाटील यांनी सांगितले.पुरस्कारात पास, निधीत नापास...अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यस्तरावरचे पुरस्कार मिळविण्यात जिल्हा परिषद पास झाली आहे. याउलट भरीव निधी, उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यात पदाधिकारी नापास झाले आहेत, असा आरोप माने यांनी केला.