शहरं
Join us  
Trending Stories
1
असले नालायक लोक माझ्या पक्षात नको; पळून पळून जाणार कुठं? दोषींवर कारवाई होणार - अजित पवार
2
'संघराज्य रचनेचा अनादर, ED ने सर्व मर्यादा ओलांडल्या...', सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
3
आठवडाभराने करणार होता प्रपोज, पण..., इस्राइली दूतावासातील कर्मचाऱ्यांची प्रेमकहाणी राहिली अधुरी 
4
दानिश निघाला ISI एजंट, दिल्लीत बसून करायचा हेरगिरी; ज्योती मल्होत्रा प्रकरणात मोठा खुलासा
5
'महामंदी' येणार? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा इशारा! म्हणाले फक्त 'या' गोष्टीच तुमची संपत्ती वाचवतील
6
MI vs DC: मुंबईनं सामना जिंकला अन् मालकीण निता अंबानी यांनी प्रेक्षकांचे मन! पाहा फोटो
7
बापरे! ७ महिन्यांत २५ लग्न केली, नवरीने सुहागरात्रीनंतर प्रत्येकाला लुटले; कारनामे ऐकून सर्वांनाच धक्का बसला
8
Video - घरातून बाहेर पडला अन् चालतानाच खाली कोसळला; २५ वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू
9
"माझी आई फुकट आणायची"; परदेशात ४ हजारांना विकली जाणारी बॅग पाहताच नेटकरी सुसाट
10
नका हो, तीन मुलांच्या आईसोबत माझे लग्न लावू नका, मी तर...; गावकऱ्यांनी काही ऐकले नाही, पठ्ठ्या लिव्ह इनमध्ये राहत होता... 
11
Video : घरात लाईट नाही म्हणून एटीएममध्येच थाटला संसार; सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडीओ
12
Vaishnavi Hagwane : वैष्णवीचा नवरा शशांककडून वहिनीलाही मारहाण; मयूरीच्या भावाने CCTV फुटेज दाखवले
13
Jyoti Malhotra : पहलगाम हल्ल्यादरम्यान कोणाच्या संपर्कात होती? ज्योती मल्होत्राबद्दल खळबळजनक खुलासा
14
"सिंदूर स्फोटक बनतं तेव्हा...’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकिस्तानला पुन्हा इशारा 
15
IPL संपताच वैभव सूर्यवंशीला मिळाले 'मुंबईकर' कोच; नव्या प्रशिक्षकांना किती मिळणार पगार?
16
"एका मुर्ख महिलेसाठी तो...", मराठी अभिनेत्रीसोबत गोविंदाच्या अफेअरच्या चर्चा, पत्नीने सोडलं मौन
17
३०,००० क्षमतेचे हॉस्टेल, ३००० कोटींची गुंतवणूक! ट्रम्प बघतच राहिले, टीम कुक 'मेक इन इंडिया'वर फिदा
18
माझ्या नसांमध्ये रक्त नाही, गरम सिंदूर...आता फक्त PoK..; पीएम मोदींचा पाकिस्तानला थेट इशारा
19
"नणंद आणि दिराने चारित्र्यावर संशय घेतला, तर सासऱ्यांनी…’’ हगवणे यांच्या थोरल्या सुनेने केले गंभीर आरोप 
20
बचपन का प्यार! बायको-पोरांना सोडून बालपणीच्या मैत्रिणीसोबत फुर्र झाला ६० वर्षांचा वकील; पण २४ तासांतच..

सहकारमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात संचालक न्यायालयात

By admin | Updated: February 25, 2015 00:48 IST

उद्या होणार सुनावणी : सहकार विभागाकडे मालमत्तेची प्रतिज्ञापत्रेही सादर

कोल्हापूर : जिल्हा बँकेच्या जबाबदारी निश्चिती प्रकरणात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात बँकेच्या माजी संचालकांनी न्यायालयात आव्हान दिले आहे. याची सुनावणी उद्या, गुरुवारी होणार आहे. न्यायालयात आव्हान देत असताना संचालकांनी मालमत्तेविषयी प्रतिज्ञापत्रेही सहकार विभागाकडे सादर केली आहेत. विभागीय सहनिबंधक राजेंद्र दराडे यांनी केलेल्या १४७ कोटींच्या जबाबदारी निश्चितीविरोधात माजी संचालकांनी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे अपील केले होते. त्यावर १८ फेबु्रवारीला सुनावणी होऊन संचालकांच्या मालमत्तेत फेरफार न करण्याच्या अटीवर जप्तीच्या कारवाईला स्थगिती दिली होती. मालमत्तेबाबत प्रत्येक संचालकाने प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही त्यांनी दिले होते. याविषयीची पुढील सुनावणी २८ मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यानुसार संचालकांनी सहकार विभागाकडे मालमत्तेविषयी प्रतिज्ञापत्र सादर केले, पण सहकारमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)थकीत संस्थांची २०० कोटींची मालमत्ताविना तारण व अल्प तारण कर्जवाटप ६५ संस्थांना केले होते. त्यातील वसुलीसह इतर कारणाने ३७ संस्थांची थकबाकी कमी झाली. उर्वरित २८ संस्थांची ५० कोटींच्या आसपास थकीत रक्कम निघेल. या वसुलीसाठी संबंधित संस्थांसह संचालकांची मालमत्ता सुमारे २०० कोटींची असताना बॅँकेच्या संचालकांकडून वसुली का करता, या मुद्द्यावरच न्यायालयात युक्तिवाद रंगण्याची शक्यता आहे. ‘त्या’ संचालकांची नावे वगळण्याची विनंती२००१ पर्यंत संचालक असणाऱ्या सात संचालकांची नावे कारवाईतून वगळावीत, कारवाई ज्या काळातील कामकाजाबाबत झाली, त्यात त्यांचा सहभाग नाही, अशी विनंती आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे केली, पण याबाबत सहकारमंत्र्यांनी प्रतिसाद दिला नसल्याचे समजते.अधिकाऱ्यांवर अब्रूनुकसानीचा दावा?जिल्हा बॅँकेच्या २००२ ते २००७ मधील लेखापरीक्षण अहवालानुसार तत्कालीन संचालकांवर ही कारवाई करणे अपेक्षित होते, पण अधिकाऱ्यांनी अगोदरच्या पाच वर्षांतील संचालकांची नावे यात घुसडली आहेत. असे सात संचालक आहेत, त्यांनी निष्कारण आपली बदनामी केल्याबद्दल बॅँक अधिकाऱ्यांसह सहकार विभागातील अधिकाऱ्यांवर अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, या संचालकांसह त्यांचे नातेवाईक उपोषणाला बसणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.