शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडीच्या हालचाली

By admin | Updated: April 6, 2016 00:09 IST

इचलकरंजी नगरपालिका : भाजप स्वतंत्र लढणार का?, शहर विकास आघाडीच्या अस्तित्वाचा प्रश्न

राजाराम पाटील -- इचलकरंजी ‘जनतेतून नगराध्यक्ष’ असा प्रयोग पुन्हा शासन राबविण्याचा विचार करीत असून, त्यामुळे येत्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांत होणाऱ्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बहुतांशी नगराध्यक्ष भाजपचे निवडले जातील, असा व्होरा भाजपचा आहे. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी पालिका निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त भाजपकडून ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढविली जाणार का, याचीच चर्चा राजकीय क्षेत्रात रंगली आहे.नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांकडूनसुद्धा अनेक प्रयोग करण्यात आले. त्यामध्ये चार नगरसेवकांचा एक प्रभाग, असा प्रयोग नुकताच सन २0११ मध्ये राबविण्यात आला होता. मात्र, आता दोन नगरसेवकांचा एक प्रभाग, असा प्रयोग राबविण्याचा विचार भाजप करीत आहे. त्यामुळे राज्यातील आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपचे किंवा भाजपच्या विचारसरणीशी मिळतेजुळते उमेदवार अधिक संख्येने निवडले जातील, असा तर्क लढविला जात आहे. त्याचबरोबर जनतेतून नगराध्यक्ष निवडला गेल्यास राज्यातील मोठ्या शहरांमध्ये नगराध्यक्ष भाजपचा होईल, असाही एक विचार आता समोर येत आहे.यापूर्वी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये सन १९७४-७५मध्ये झालेल्या पालिकांच्या निवडणुकीत ‘जनतेतून नगराध्यक्ष’ हा प्रयोग सर्वांत प्रथम राबविण्यात आला. त्यावेळी इचलकरंजीत असलेल्या नागरी आघाडीचे पंडितराव कुलकर्णी विरुद्ध काँग्रेसचे मल्हारपंत बावचकर अशी सरळ लढत झाली होती. या लढतीत पंडितराव कुलकर्णी निवडून आले. मात्र त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसचे बहुमत झाले. त्यांनी मांडलेले अनेक विषय काँग्रेस बहुमताने फेटाळत होते. त्यामुळे कुलकर्णी यांना नगरपालिकेचे कामकाज चालविता आले नाही. अवघ्या दोन ते अडीच वर्षांत यांची कारकीर्द त्यावेळी संपुष्टात आली.त्यानंतर सन २00५ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारने ‘जनतेतून नगराध्यक्ष’ ही संकल्पना पुन्हा राबविली. त्यावेळी इचलकरंजीत किशोरी आवाडे (काँग्रेस), कलावती जांभळे (बंडखोर अपक्ष) व आशादेवी कदम (नागरी आघाडी) अशी तिरंगी लढत झाली होती. त्यामध्ये किशोरी आवाडे या बहुमताने निवडून आल्या. मात्र, त्यावेळी काँगे्रसचे बहुमत झाले नसल्याने त्यांना अन्य पक्षांबरोबर आघाडी करून कामकाज चालवावे लागले.अशा प्रकारे इचलकरंजी नगरपालिकेचा आतापर्यंतचा इतिहास असून, या पार्श्वभूमीवर ‘जनतेतून नगराध्यक्ष’ ही संकल्पना येथे राबविली जात असताना भाजप स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढविणार का, अशा आशयाची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण सध्याचे भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी स्थापन केलेली शहर विकास आघाडी नगरपालिकेत कार्यरत आहे. त्यामुळे भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असेल, तर शहर विकास आघाडीचे काय होणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.‘भाजप’च्या नगराध्यक्षांची उत्सुकताभाजपकडे सवर्साधारणपणे हिंदुत्ववादाचा अंगिकार करणारा पक्ष म्हणून पाहिले जाते. इचलकरंजीत मात्र आगामी नगराध्यक्षपद हे मागासवर्गीय खुला प्रवर्गासाठी आरक्षित आहे, अशा पार्श्वभूमीवर जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा झाल्यास भाजपकडे उमेदवार कोण, असाही प्रश्न सध्या तरी अनुत्तरित आहे. उलट काँग्रेस व राष्ट्रवादीकडून काही इच्छुकांनी तशा हालचाली सुरू केल्या असून, सध्या ते विविध उपक्रमांद्वारे जनतेच्या समोर येत आहेत.