शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल कंपनीने ११०० रुपये बोनस दिला; टोल प्लाझावरील कर्मचाऱ्यांनी असा बदला घेतला, १० हजार गाड्या फ्रीमध्ये सोडल्या...
2
नवी मुंबईत अग्नितांडव! वाशीतील आगीत ६ वर्षांच्या मुलीसह ४ जणांचा मृत्यू, १० जण जखमी
3
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
4
नवी मुंबईत भीषण आगीत होरपळून माय-लेकीचा मृत्यू; सिलिंडर स्फोटानंतर इतर बाहेर पडले पण दोघी अडकल्या
5
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
6
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
7
रात्री पार्टी, बहिणीला व्हिडीओ कॉल अन् पहाटे पत्नीचा मृत्यू; मृतदेह सोडून विधानसभा अध्यक्षांचा पुतण्या फरार
8
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
9
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
10
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
11
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
12
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
13
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
15
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
16
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
17
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
18
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
19
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
20
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."

गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची थेट केंद्रीय मंत्रालयाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 18:47 IST

kolhapur news, inquiry, Union Ministry, street dog death गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी कोणी तक्रार करु शकेल असे वाटते का? परंतु कोल्हापूरातील एका व्यक्तीने गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय मंत्रालयाकडे केली आणि केंद्रानेही चौकशीचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

ठळक मुद्देगल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची थेट केंद्रीय मंत्रालयाकडून चौकशीचौकशीसाठी तीन उपायुक्त दजाचे अधिकारी नियुक्त

कोल्हापूर : गल्लीत फिरणाऱ्या कुत्र्यांसाठी कोणी तक्रार करु शकेल असे वाटते का? परंतु कोल्हापूरातील एका व्यक्तीने गल्लीतील कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी थेट केंद्रीय मंत्रालयाकडे केली आणि केंद्रानेही चौकशीचे आदेश दिल्याने स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले आहे.कोल्हापूर शहरातच नव्हे, तर प्रत्येक शहरात मोकाट कुत्री दिवसरात्र फिरत असतात. रात्रीेबेरात्री या कुत्र्यांचा उच्छाद सहनही करावा लागतो. म्हणूनच वेळोवेळी महानगरपालिका कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहिम राबवत असते. पकडलेल्या कुत्र्यांसाठी निर्बिजीकरणाचीही वेगळी मोहिम सुरु असते. ही कुत्री परत त्यांच्या त्यांच्या जागी जातात.अशाच एका कुत्र्याचे निर्बिजीकरण केल्यानंतर महानगरपालिकेच्या यंत्रणेने त्याला त्याच्या मूळ जागी म्हणजे राजेंद्रनगर परिसरात सोडले. काही दिवसांनी या कुत्र्याचा मृत्यू झाला. याची दखल घेत एका प्राणीप्रेमी व्यक्तीने घेतली आणि त्याने ईमेलद्वारे थेट दिल्लीदरबारीच तक्रार केली, की या कुत्र्याचा मृत्यू कसा झाला.केंद्र सरकारनेही तत्काळ याची दखल घेत राज्य सरकारला चौकशीचे आदेश दिले. राज्याकडून महापालिका यंत्रणेकडे हे आदेश येताच तीन उपायुक्त दजाचे अधिकारी यासाठी नियुक्त करण्यात आले. आता सध्या या कुत्र्याच्या मृत्यूची चौकशी सुरु असल्याची माहिती महानगरपालिकेमार्फत पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत कोणी तक्रार केली, हे मात्र गुलदस्तातच राहिले आहे.याप्रकरणी चौकशी अहवाल केंद्र सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. काहीही असले तरी यात दोषी ठरणाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे, हे नक्की.

टॅग्स :dogकुत्राMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर