शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

ईबीसीधारक विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 14:44 IST

टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसोमवारपासून नियमित स्वच्छताशिक्षण सहसंचालकांनी जाणून घेतल्या अडचणी

कोल्हापूर : टाकाळा परिसरात आर्थिकदृष्ट्या मागास (ईबीसीधारक) विद्यार्थ्यांसाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे वसतिगृह आहे. त्या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील ३८ विद्यार्थी राहत आहेत. त्यांच्या जेवणाची सुविधा पूर्ववत सुरू झाली आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.शिक्षण सहसंचालक डॉ. अजय साळी यांनी गुरुवारी (दि. ३) वसतिगृहाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत येथील प्रशासनाधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानंतर वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था सुरू करण्यात आली.

 विद्यार्थ्यांना सकाळी नाष्टा आणि दोन वेळचे जेवण देण्यात येणार आहे. येथील स्वच्छतागृह आणि परिसराची सोमवार (दि. ७) पासून नियमितपणे स्वच्छता करण्यात येईल. वसतिगृहात स्वयंपाक बनविण्यासाठी आवश्यक भांडी दिली जाणार आहेत. त्याबाबतची कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती डॉ. साळी यांनी शुक्रवारी दिली.अहवाल देण्याची सूचनाविद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या आहेत. त्याबाबतचा अहवाल सोमवार (दि. ७) पर्यंत देण्याची सूचना वसतिगृहाच्या प्रशासनाधिकाऱ्यांना दिली आहे. या अहवालानुसार पुढील कारवाई करणार असल्याचे साळी यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रkolhapurकोल्हापूर