शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉलचे जेष्ठ मार्गदर्शक दिलीप जोशी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:28 IST

पन्हाळा येथील व्हॉलीबॉल खेळाचे जेष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते पन्हाळ्याचे आदरणीय व्यक्तिमत्त्व दिलीप श्रीधर जोशी (वय ६९) यांचे अल्पश: आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

ठळक मुद्दे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व्हॉलीबॉलचे जेष्ठ मार्गदर्शक दिलीप जोशी यांचे निधनत्यांच्या निधनाने पन्हाळ्यावर सर्व व्यव्हार बंद

पन्हाळा : पन्हाळा येथील व्हॉलीबॉल खेळाचे जेष्ठ मार्गदर्शक आणि महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेते पन्हाळ्याचे आदरणीय व्यक्तिमत्त्व दिलीप श्रीधर जोशी (वय ६९) यांचे अल्पश: आजाराने गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.पन्हाळ्यासारख्या लहान गावात व्हॉलिबॉल खेळाची जुनी परंपरा आहेच. त्या खेळाचा लौकीक नव्याने वाढविण्यासाठी जोशी सरांनी या खेळासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांनी राज्यस्तरीय संघात सलग नऊ वर्षे सहभाग घेतला आणि तीन वर्षे नेतृत्व केले. पन्हाळ्यात चार राष्ट्रीय, पंचवीस राज्यस्तरीय, सहा जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले होते. 

पुणे येथे आणि नागपुर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय युथ स्पर्धेच्या आयोजनाच्या महत्वाच्या भुमिके बरोबरच २०१८ मध्ये पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया व्हॉलिबॉल स्पर्धेच्या तंत्र समितीचे प्रमुख तर त्याच वर्षी शिर्डी येथे झालेल्या मिनी राष्ट्रीय व्हॉलिबॉल स्पर्धेचे पंच प्रमुख म्हणुन त्यांनी काम केलेखेळाव्यतिरिक्त स्टेट बँक आॅफ इंडियामध्ये जोशी सरांनी उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल गुणवंत कामगार म्हणुन सन्मानित करण्यात आले होते.

पन्हाळा ऐज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे ते चेअरमन होते. गणित हा विषय त्यांच्या अत्यंत आवडीचा. पन्हाळ्यातील सर्वच मुलांना ते हा विषय शिकवत असत. ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. पन्हाळ्यावर त्यांच्या निधनाने सर्व व्यव्हार बंद ठेवण्यात आले होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर