शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दिलबहार ‘अ’ची विजयी सलामी

By admin | Updated: November 24, 2014 00:12 IST

के.एस.ए. लीग फुटबॉल : संध्यामठ-प्रॅक्टिस ‘ब’ यांच्यात २-२ बरोबरी

कोल्हापूर : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनतर्फे आयोजित के.एस.ए लीग ‘ए’ डिव्हीजन फुटबॉल स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात दिलबहार तालीम मंडळ ‘अ’ने प्रॅक्टिस क्लब ‘अ’वर २-० अशी मात केली, तर संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस ‘ब’ यांचा सामना २-२ असा बरोबरीत राहिला.शाहू स्टेडियम येथे दुपारी चार वाजता दिलबहार ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस क्लब ‘अ’ यांच्यात झालेल्या सामन्यात पूर्वार्धाच्या १६ व्या मिनिटाला ‘दिलबहार’च्या जावेद जमादारने कॉर्नर किकद्वारे दिलेल्या पासवर नीलेश जाधव याने हेडद्वारे गोलची नोंद करत आपल्या संघास १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ४७ व्या मिनिटाला ‘दिलबहार’च्या सनी सनगरने मोठ्या ‘डी’बाहेरून चार खेळाडूंना चकवत गोलची नोंद केली. त्यामुळे २-० अशी भक्कम आघाडी झाली. ‘दिलबहार’कडून प्रतीक व्हनाळीकर, करण चव्हाण, साईराम जाधव, गोलरक्षक दीपक कांबळे यांनी चांगली कामगिरी केली. सामन्याच्या पूर्णवेळेत ‘प्रॅक्टिस’ला बरोबरी करता न आल्याने अखेर सामना दिलबहार‘अ’ ने २-० असा जिंकलादुपारी दोन वाजता पहिला सामना प्रॅक्टिस क्लब ‘ब’ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात झाला. सामन्याच्या ७ व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून अक्षय पाटीलने पहिला गोल नोंदविला. २० व्या मिनिटाला ‘संध्यामठ’कडून ओंकार सूर्यवंशी याने गोल नोंदवत २-० अशी आघाडी घेतली. मात्र, पुढील मिनिटातच २१ व्या मिनिटाला प्रॅक्टिस ‘ब’च्या स्वप्निल करपेने गोल करत आघाडी २-१ अशी कमी केली. ‘संध्यामठ’च्या ओंकार सूर्यवंशीच्या गोल करण्याच्या अनेक संधी गेल्या. ६२ व्या मिनिटाला प्रॅक्टिसकडून प्रथमेश यादवने आलेल्या संधीवर गोलची नोंद करत सामना २-२ असा बरोबरीत आणला. शेवटच्या मिनिटांपर्यंत दोन्ही संघांकडून गोल नोंदविण्याचे प्रयत्न झाले. मात्र, त्यांना अखेरपर्यंत यश आले नाही. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे पेट्रन -इन-चीफ श्री शाहू छत्रपती महाराज यांनी फुटबॉलला किक मारून केले. यावेळी महाराजकुमार मालोजीराजे, के. एस. ए.चे अध्यक्ष डी.के.अतितकर, उपाध्यक्ष दीपक शेळके, सीनिअर संघांचे अध्यक्ष माणिक मंडलिक, श्रीनिवास साळोखे, अजित खराडे, रावसाहेब सरनाईक, विनायक फाळके, शशिकांत नलवडे, सुमित पाटील, अरुण दळवी उपस्थित होते.के.एस.ए. फुटबॉल लीग स्पर्धेचे उद्घाटन श्री शाहू छत्रपती महाराज यांनी फुटबॉलला किक मारून केले. सोबत मालोजीराजे, डी. के. अतितकर, दीपक शेळके, सीनिअर संघांचे अध्यक्ष माणिक मंडलिक, श्रीनिवास साळोखे, अजित खराडे, रावसाहेब सरनाईक, विनायक फाळके, आदी .आजचे सामनेदुपारी २ वाजता : पाटाकडील ‘ ब’ विरुद्ध पॅट्रियट स्पोर्टस्दुपारी ४ वाजता : खंडोबा विरुद्ध शिवनेरी स्पोर्टस्