शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Kolhapur: चित्रपट महामंडळातील वादात तीन कोटींच्या वास्तूचे दशावतार, भूतबंगल्यासारखी झाली अवस्था

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: April 28, 2023 12:33 IST

कारभाऱ्यांच्या या वादात आता वास्तूची अवस्था ‘अरे, ही नवी इमारत होती?’ असा प्रश्न पडण्यासारखी झाली

इंदूमती गणेश कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातील कारभाऱ्यांच्या वादात साडेतीन वर्षांपूर्वी कार्यालयासाठी खरेदी केलेल्या नव्या वास्तूच्या दुर्दैवाचे दशावतार झाले आहेत. अर्धवट झालेले सिलिंग, फर्निचर, विद्युत व्यवस्था, फरशीवर वीतभर साचलेली धूळ, प्लायवूडसह बांधकामाचा पडलेला कचरा, लटकलेल्या वायरी अशी एखाद्या भूतबंगल्यापेक्षाही वाईट अवस्था या नव्या कोऱ्या वास्तूची झाली आहे.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मुख्यालय कोल्हापूर असल्याने येथे महामंडळाचे देखणे कार्यालय व्हावे या उद्देशाने २ ऑगस्ट २०१९ रोजी रेल्वे स्टेशनसमोर उभारण्यात आलेल्या नव्या टोलेजंग इमारतीत अडीच हजार स्क्वेअर फुटांची वास्तू २ कोटी ४५ लाखांना खरेदी करण्यात आली. हे मुंबई, पुण्यापेक्षा सर्वांत मोठे कार्यालय आहे. ते खरेदी करण्यासाठी कोल्हापूरच्या संचालकांनी, चित्रपट व्यावसायिकांनी जंगजंग पछाडले होते.या वास्तूची सद्य:स्थिती काय हे पाहण्यासाठी ‘लोकमत’चे प्रतिनिधी गेले असता फरशीवर आणि अर्धवट काम झालेल्या फर्निचरवर वीतभर धूळ साचली होती. कापलेले प्लायवूड, सिलिंगच्या पट्ट्या, बांबू, काठ्या अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. काही फर्निचर खराब झाले होते.काम सुरू होते तोपर्यंत कोरोना आला, नंतर अध्यक्ष आणि संचालकांमध्ये वाद सुरू झाले, आरोप-प्रत्यारोप झाले, अध्यक्ष बदलाच्या हालचाली झाल्या, कार्यकारिणीची बैठकच झाली नाही आणि मे २०२१ रोजी कार्यकारिणीची मुदत संपली. कारभाऱ्यांच्या या वादात आता वास्तूची अवस्था ‘अरे, ही नवी इमारत होती?’ असा प्रश्न पडण्यासारखी झाली आहे.

असे होते नियोजन

येथील फर्निचर, सिलिंग, विद्युत व्यवस्था, रंगकाम, एसी असे वेल फर्निश्ड काॅर्पोरट ऑफिसमध्ये रूपांतर करण्यात येणार होते. येथे महामंडळाचे कार्यालय तसेच चित्रीकरणासाठीही त्याचा उपयोग केला जाणार होता. त्यासाठी सुरुवातीला २५ लाखांचे बजेट ठरले; पण काही संचालकांनी त्याला विरोध करून कमी रकमेत करूया असे सांगितले. पहिल्या टप्प्यात १७ ते १८ लाखांचे जवळपास ४० टक्के काम झाले.

एकमेकांच्या पायात पायया वास्तूचे काम करून घेण्यासाठी सर्वाधिकार स्थानिक संचालकांना दिले होते. त्यासाठी निविदा काढून एकाच व्यक्तीला ठेका दिला असता तर आज कार्यालय नव्या इमारतीत थाटले गेले असते; पण असे झाले नाही. प्रत्येक कामासाठी वेगवेगळा माणूस ठरवला गेला. एका संचालकाने ठरवलेल्या माणसाला दुसऱ्याने विरोध करायचा असे एकमेकांच्या पायात पाय घालण्यामुळे वास्तूचे काम रखडले. कार्यालयासाठी भांडलेले आता त्याकडे ढुंकून बघायला तयार नाहीत.

कोल्हापूरला काॅर्पोरेट कार्यालय व्हावे अशी इच्छा होती; पण स्थानिक संचालकांमुळे काम ठप्प झाले. अजूनही वेळ गेेलेली नाही. सर्वांनी एकत्र येत कामाचे ऑडिट करून पुढील काम सुरू करण्याचा ठराव करावा. कार्यकारिणीची मुदत संपल्याने व न्यायप्रविष्ट बाब असल्याने कितपत रक्कम खर्च करता येते यावर धर्मादायकडे विचारणा करून आम्ही सर्वप्रकारे मदत करायला तयार आहोत. - मेघराज राजेभोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर