शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

बोरवडेच्या उजव्या कालव्यावरील जीर्ण पूल कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2024 15:08 IST

पर्यायी सोय नसल्याने शेतकऱ्यांची कुचंबणा 

दत्ता लोकरे, लोकमत न्यूज नेटवर्क, सरवडे : बोरवडे ( ता. कागल ) येथील हद्दीत गावच्या डोंगर भागात शेतीच्या कामांनी व वरील पिकवलेला ऊस ने आण करण्यासाठी हा पूल अत्यंत उपयोगी होता.तो पुल आज रविवारी सकाळी कोसळला. दोन वर्षांपासून पुलाच्या पिलरचे दगड कोसळू लागल्याने पुल धोकादायक बनला होता.यासंबंधी वारंवार पाठपुरावा करुनही संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर आज पुलाचा पिलर कोसळत पूल वाहत्या पाण्यात ढासळला. यामुळे डोंगर भागाकडे जाणारा मार्गच बंद झाल्याने शेतकऱ्यांचे हाल  होणार आहेत. या ठिकाणी लवकरात लवकर नवीन पुल उभारावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी सन १९८७ ला ३५  वर्षांपूर्वी पुल उभारला होता. या भागात परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती असल्याने शेतकऱ्यांना या पुलावरुनच वाहतुक करावी लागते. कॅनॉलच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाच्या शेतीचे क्षेत्र आहे या विभागात सुमारे ४० हजार टन ऊस कारखान्यांना जातो.या पुलावरुन ऊसाची वाहतुक सुरु असते.

दोन वर्षांपासून या  पुलाच्या पिलरचे दगड निखळून पडल्याने पुलाला धोका निर्माण झाला होता. याबाबत लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी येथे नवीन पुल उभारण्याची मागणी केली होती. परंतू या मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने हा पुल आज पडला. यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना दूरवर १० कि.मी अंतरावरून  मुदाळ तिट्टा येथील पुलावरुन ये-जा करावी लागणार असल्याने त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार आहे. या ठिकाणी नवीन पुल तात्काळ उभारावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. 

नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला

या कालव्यावरुन सकाळी ट्रँक्टरमध्ये महिला बसून भेतीच्या कामासाठी निघाल्या होत्या. तो पुढे गेला आणि मागून मोकळा ट्रँक्टर जात असताना पूल कोसळला गावकऱ्यांनी ट्रँक्टर बाहेर काढला त्यामुळे नशीब बलवत्तर म्हणून मोठा अनर्थ टळला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर