शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

भगवान महावीर सेवा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 17:33 IST

Hospital Kolhapur : कोल्हापूर येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लॅबोरेटरीसोबत आता माफक दरामधे डिजिटल एक्स-रे ही सुविधा उपलब्ध झाली असून या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले.

ठळक मुद्देभगवान महावीर सेवा रुग्णालयात डिजिटल एक्स-रे शुभारंभअतिशय माफक दरात डिजिटल एक्स-रे सेवा उपलब्ध

कोल्हापूर : येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत चालविण्यात येणाऱ्या सेवार्थ रुग्णालयात लॅबोरेटरीसोबत आता माफक दरामधे डिजिटल एक्स-रे ही सुविधा उपलब्ध झाली असून या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन सोमवारी सातारा येथील शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते झाले.गुजरी येथील भगवान महावीर सेवा धाममार्फत गुजरी येथे सेवार्थ रुग्णालय चालविले जाते. येथे अतिशय माफक दरात रुग्णांची तपासणी केली जाते तसेच येथील प्रयोगशाळेत विविध चाचण्या कमी खर्चात केल्या जातात. आता कोल्हापूर विभागातील पहिले डिजिटल एक्स-रे मशिन महावीर सेवा धाम येथे सर्वांच्या सेवेकरिता उपलब्ध झाले असून ही सेवाही अतिशय माफक दरात उपलब्ध झाली आहे.येथील महावीर सेवा धामच्या सभागृहात झालेल्या छोट्याशा कार्यक्रमात सातारा येथील लाभार्थी परिवार शुभदा सुभाष दोशी यांच्या हस्ते या डिजिटल एक्स-रे मशिनचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आचार्यदेव श्री महासेन सूरीश्वरजी महाराज उपस्थित होते. जगभरात कोरोनासारख्या महामारीने समाज त्रासलेला असताना सेवा धाममार्फत सुरु असलेले हे मानव सेवेचे कार्य असेच अखंड चालू राहू दे असा आशिर्वाद यावेळी महाराजांनी दिला. गणिवर्य विक्रमसेन महाराज आणि साध्वीजी ऋजूप्रज्ञाश्रीजी यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.या प्रसंगी सातारा येथील सुभाष दोशी, प्रफुल्ल दोशी परिवार, शा अंबालालजी राठोड परिवार, डॉ. मनाली बाफना, डॉ. वरूण बाफना, सीमंधर कोविड केअरचे ट्रस्टी यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी महावीर सेवा धामचे अध्यक्ष विनोद ओसवाल, नरेंद्र राठोड, अमर गांधी, दिलिप गांधी, प्रवीणभाई मणियार, वसंतभाई शाह तसेच महावीर सेवा धामचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलReligious programmeधार्मिक कार्यक्रमkolhapurकोल्हापूर