शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या चुकांमुळे मराठा आरक्षणाला अडचणी

By admin | Updated: September 27, 2015 00:45 IST

सुरेश पाटील : आरक्षणप्रश्नी पुन्हा रस्त्यावर उतरणार

सांगली : अशासकीय समिती नियुक्त करतानाच आयोगाच्या शिफारसींचा विचार न करता मराठा आरक्षणाचा अहवाल तयार केल्यामुळेच न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आले, असे मत मराठा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, आरक्षणप्रश्नी पुन्हा रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आघाडी सरकारने नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्त केली. राणे समितीच्या अहवालासाठी आयोगाच्या शिफारसींची गरज होती. तांत्रिक चुकांमुळेच न्यायालयीन लढाईमध्ये अपयश आले. कॉँग्रेस आघाडी सरकारने निवडणुका डोळ््यासमोर ठेवून घाईगडबडीत आरक्षण दिले होते. त्यामुळे आरक्षणाला विरोध करणारे याचिकाकर्ते यात यशस्वी झाले. न्यायालयाने त्यास स्थगिती दिली. त्रुटींबाबत ठोस बाजू सरकारला मांडता न आल्याने सर्वोच्च न्यायालयाने शासनाची आव्हान याचिकाही फेटाळली. आता पुन्हा न्यायालयीन लढाईत सक्षमपणे हा प्रश्न मांडण्यासाठी वकिलांचे एक पॅनेल आम्ही तयार केले आहे. त्यामाध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान सरकारने नेमलेल्या वकील पॅनेलमधील अ‍ॅड. रवींद्र आडसुरे यांच्या हटवादी भूमिकेचाही फटका आरक्षणाच्या प्रश्नाला बसत आहे. त्यामुळे आम्ही वकील बदलण्याची मागणी केली आहे. त्याशिवाय राजस्थान सरकारने गुज्जरांसह विशेष मागास वर्गासाठी पाच टक्के आणि आर्थिकदृष्ट्या मागास वर्गासाठी १४ टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर केले आहे. राजस्थान सरकारच्या धर्तीवरच महाराष्ट्रातही आरक्षणाची मर्यादा तोडण्याचे धाडस दाखवावे लागेल. दाखले काढलेल्या मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था वाढली आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्या अखत्यारित मराठा समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत द्यावी किंवा शिष्यवृत्ती जाहीर करावी. अन्य मागासवर्गीय महामंडळांना मोठ्या निधीची तजवीज केली जात असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला तुटपुंजा निधी देण्यात येत आहे. त्यास निधी वाढवून द्यावा, अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ््याची उभारणी करावी, खुल्या प्रवर्गातील जागा भराव्यात, आदी मागण्यांसाठी आंदोलन छेडणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी जिल्हाध्यक्ष वैभव शिंदे, भरत पाटील, प्रताप पाटील, रमेश पाटील, विकास पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)