शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणासाठी धनगर समाज रस्त्यावर

By admin | Updated: August 6, 2014 00:40 IST

भर पावसात मोर्चा : जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; अनुसूचित जमाती आरक्षण अंमलबजावणीची मागणी

कोल्हापूर : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करा, यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे आज, मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. भर पावसात ‘यळकोट यळकोट जय मल्हार...बिरोबाच्या नावानं चांगभलं...’या जयघोषासह धनगर वाद्यांच्या गजरात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यांतून आलेले दीड हजारांहून अधिक धनगर समाज बांधव आंदोलनात सहभागी झाले होते.दुपारी साडेबाराच्या सुमारास दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिवळे झेंडे, कपाळी भंडारा, पिवळ्या टोप्या त्यावर दोन्ही बाजूला मी धनगर व ‘एसटी’ आरक्षण मिळालेच पाहिजे, असे घोषवाक्य. धनगरी ढोल व कैताळांचा आवाज अशा वातावरणात निघालेल्या मोर्चात धनगर बांधवांची संख्या लक्षणीय होती. घोषणाबाजी करत हा मोर्चा व्हीनस कॉर्नर, बसंत-बहार टॉकीजमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. यातच भर पावसातही आंदोलकांचा उत्साह दांडगा होता. या ठिकाणी धनगर समाजातील मान्यवरांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. यानंतर शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.समाजशास्त्रज्ञ ईरावती कर्वे आणि मानवशास्त्रज्ञ कोलनल डेलस्टॉन यांनी केलेल्या संशोधनानुसार १८७२ पासून धनगर समाजाचे वास्तव्य आहे. हा समाज अत्यंत मागास असल्याचे वर्णन केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील धनगर आणि धनगड जमात एकच असून, आम्हाला इतरांचे काढून आरक्षण नको आहे. घटनेने दिलेले अनुसूचित जमातींच्या सूचितील हक्काचे आरक्षण हवे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.आंदोलनात बाबूराव हजारे, अशोकराव कोळेकर, विलासराव वाघमोडे, नगरसेवक सत्यजित कदम, रामभाऊ डांगे, बाबासाहेब सावगावे यांच्यासह धनगर बांधव सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)