शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिकांचे भविष्य मोठे : चंद्रकांतदादा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 17:37 IST

कोल्हापूर : धनंजय महाडिक कर्तबगार खासदार असून, त्यांनी अपयशाने खचून न जाता संकटावर मात करून विजय मिळविला. त्यांचे भविष्य मोठे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. दादा राज्यातील क्रमांक दोनचे नव्हे, तर क्रमांक एकचे ताकदवान मंत्री होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी कोल्हापुरात आयोजित ...

ठळक मुद्दे‘दादा’, तुम्ही क्रमांक एकचे मंत्री : महाडिक तंबाखू संघाच्या कार्यक्रमात उधळली स्तुतिसुमनेभाजपच्या कामावर महाडिक खूश

कोल्हापूर : धनंजय महाडिक कर्तबगार खासदार असून, त्यांनी अपयशाने खचून न जाता संकटावर मात करून विजय मिळविला. त्यांचे भविष्य मोठे असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. दादा राज्यातील क्रमांक दोनचे नव्हे, तर क्रमांक एकचे ताकदवान मंत्री होणार असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.तंबाखू संघाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. राजकारणात शुभचिंतकांबरोबरच हितचिंतकांचा भरणा असतो. हितचिंतक आपल्या बरोबर राहून आपला काटा काढतात. डॉ. संजय पाटील यांचे त्यामुळे नुकसान झाले; पण आता काळजी करू नका. दादांसारखे ताकदवान मंत्री पाठीशी आहेत. काहीजण त्यांना क्रमांक दोनचे मंत्री म्हणत असले, तरी ते लवकरच क्रमांक एकवर जातील, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.धनंजय महाडिक व संजय पाटील हे २००४ ला लोकसभेला उभे होते. दोघांनाही पराभव पत्करावा लागला. महाडिक यांना तर एका रात्रीत पराभूत करण्यात आहे. त्यानंतर त्यांच्या पेट्रोल पंपावर छापे टाकले; पण ते थांबले नाहीत. युवा शक्तीच्या माध्यमातून त्यांनी कामाचा डोंगर उभा केला, तरीही २००९ ला काही मंडळींनी दगा दिला. यालाही न घाबरता काम करून त्यांनी लढाई जिंकली. महाडिक यांचे भविष्य मोठे असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.तंबाखू संघाच्या कार्यक्रमात महाडिक, हाळवणकर, चंद्रकांतदादांकडून एकमेकांवर उधळलेल्या स्तुतिसुमनांची चर्चा जोरदार सुरू होती.आम्ही झाडू मारायचा का?

चंद्रकांतदादा क्रमांक एकवर जाणार असल्याचे खासदार महाडिक यांनी सांगताच, आम्ही झाडू मारायचे का? असे आमदार सुरेश हाळवणकर यांनी महाडिक यांना उद्देशून म्हटले. यावर दादा पुढे गेले की तुम्ही त्यांच्याठिकाणी जाणार, तुम्ही दोनच भाजपचे आमदार आहात. त्यात अमल अजून लहान असल्याने तुम्ही काळजी करू नका, असे महाडिक यांनी सांगताच एकच हशा पिकला.भाजपच्या कामावर महाडिक खूश

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश हाळवणकर यांच्यावर स्तुतिसुमने उधळत खासदार धनंजय महाडिक म्हणाले, भाजपच्या जिल्ह्यातील कामावर आम्ही खूश आहोत. आपल्या कामावर जिल्हा समाधानी आहे.