शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली दिलगिरी: तुम्ही सांगाल तशी पुढील वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 10:30 IST

कोल्हापूर : माझ्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत गैरसमज असल्याचे जाणवते. माझ्याकडून अनवधानाने काही गोष्टी झाल्याही असतील; पण मी त्या जाणीवपूर्वक ...

ठळक मुद्दे धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली दिलगिरी: तुम्ही सांगाल तशी पुढील वाटचालचुका पदरात घेऊन साथ देण्याचे केले आवाहन

कोल्हापूर : माझ्याबद्दल राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांत गैरसमज असल्याचे जाणवते. माझ्याकडून अनवधानाने काही गोष्टी झाल्याही असतील; पण मी त्या जाणीवपूर्वक करीत नाही आणि तो माझा स्वभावही नाही. तरीही माझ्या हातून काही चुका झाल्या असतील तर या व्यासपीठावरून त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. चुका पदरात घ्या आणि साथ द्या... असे भावनिक आवाहन करीत ‘येथून पुढे तुम्ही सांगाल त्याप्रमाणेच वाटचाल करू,’ अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाडिक यांच्या ताराराणी चौकातील कार्यालयात आयोजित मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. महाडिक म्हणाले, पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दिलेल्या संधीचे सोने करीत मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावू शकलो. आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून, भाजप सरकारविरोधात जनतेत संताप आहे. कोल्हापूर शहर मोठे आहे. शहरातील वातावरण संपूर्ण जिल्ह्यात पसरते; पण पक्षात समज-गैरसमज आहेत. कोल्हापूर शहरातील मंडळींशी चर्चा करून मार्ग काढूया. चुका पदरात घेऊन पुढील वाटचाल करूया.आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, येत्या दोन-तीन दिवसांत आघाडीचे चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत आपल्या स्तरावरून प्रचार यंत्रणा अधिक गतिमान करायची आहे. भाजप सरकारच्या काळात संविधान धोक्यात आले असून, ते वाचविण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून एकसंधपणे सामोरे गेले पाहिजे. स्थानिक प्रश्नांवर नव्हे तर देशाच्या प्रश्नांवर ही निवडणूक होणार असून, येथून धनंजय महाडिक महत्त्वाचे नाहीत. शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी कामाला लागायचे आहे. सत्ता गेल्यानंतर सगळ्यांचीच भाजली आहे. त्यांच्या हातून काही चुका झाल्या असतील त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी बाजूला ठेवून त्यांच्या विजयासाठी प्रयत्न करूया.आमदार संध्यादेवी कुपेकर म्हणाल्या, आपल्याच माणसांवर नाराज व्हायचे असते. ही नाराजी फार काळ नसते. चंदगड मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून, येथून मोठे मताधिक्य देण्यास कटिबद्ध आहे. शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी स्वागत केले.जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. कार्याध्यक्ष अनिल साळोखे, के. पी. पाटील, बी. एन. पाटील-मुगळीकर, मधुकर जांभळे, आदिल फरास यांनी मनोगत व्यक्त केले. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, भैया माने, युवराज पाटील, संगीता खाडे, जहिदा मुजावर, रोहित पाटील, आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांची वैचारिक भूमिका काय?प्रकाश आंबेडकरांना चार जागा देण्याची तयारी होती; पण त्यांनी २१ जागा मागितल्या. यावरून आंबेडकर यांची वैचारिक भूमिका काय आहे, हे स्पष्ट होते असे मुश्रीफ यांनी सांगितले.

अक्षतांना ‘पाटील’ आले, तर नको कसे म्हणायचे?नाराजी आता संपली आहे; त्यामुळे त्याबद्दल जाहीर वाच्यता करायची नाही. आम्ही प्रचारात आघाडीवर राहूच; पण कॉँग्रेसच्या नेत्यांच्या दारात जाऊन त्यांनाही सोबत घेऊ. आमच्या मुलग्याचे लग्न आहे, शेजारच्या गावातील पाटील अक्षताला येणार असतील तर नको कसे म्हणायचे? अशी मिश्कील टिप्पणी के. पी. पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता केली. यावर, ‘पुढेही (विधानसभेला) तसेच आहे का?’ असा टोला मुश्रीफ यांनी हाणला.महापौर, लाटकर यांची पाठया बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक उपस्थित होते; पण राष्ट्रवादीच्या महापौर सरिता मोरे, राजेश लाटकर यांनी पाठ फिरविली. त्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

 

 

टॅग्स :PoliticsराजकारणDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिकkolhapurकोल्हापूर