कोल्हापूर : ‘धनगरवाडा’ या चित्रपटात डंगे धनगर समाजाच्या वास्तववादी परिस्थितीचे चित्रण असून, तो रसिकांच्या पसंतीस नक्की उतरेल, असा विश्वास दिग्दर्शक समीर आठल्ये यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. ‘धनगरवाडा’ या चित्रपटातील कलाकारांनी गुरुवारी (दि. १९) लोकमत शहर कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आम्ही चित्रपटाचे चित्रीकरण सर्व ऋतुंमध्ये खऱ्या धनगरवाड्यावर जाऊन केले आहे. त्यामध्ये धनगर समाजाच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी निर्मात्या अलका कुबल, विजय दळवी, कलाकार पल्लवी पाटील, वरद चव्हाण उपस्थित होते. यावेळी पल्लवी पाटील म्हणाल्या, ‘गौरी ही माझी चित्रपटातील निरागस आणि तितकीच बंडखोर व्यक्तिरेखा साकारताना भाषेपासून प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली आहे. वरद चव्हाण यांनी सुरुवातीला शांत असणारा; पण नंतर बंडखोर बनलेला बिऱ्या धनगर साकारणे हे एक आव्हान होते’, असे नमूद केले. यावेळी ‘लोकमत’चे उपप्रबंधक मनुष्यबळ आणि प्रशासन विभाग संतोष साखरे यांनी पुष्पगुच्छ देऊन ‘धनगरवाडा’ चित्रपटाच्या टीमचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे कर्मचारी उपस्थित होते.
‘धनगरवाडा’ वास्तववादी वेदनेचे चित्रण
By admin | Updated: November 20, 2015 00:26 IST