शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

सांगलीत जिल्हास्तरीय युवा महोत्सवाची धूम

By admin | Updated: September 6, 2015 22:48 IST

विलिंग्डन, केडब्ल्यूसी’ची बाजी : नऊ सप्टेंबरपासून मध्यवर्ती महोत्सव कडेगावात होणार

हरिपूर : लोकनृत्य, पथनाट्यासह विविध कलाविष्कारांची उधळण नाट्यपंढरी सांगलीत झाली. निमित्त होते शिवाजी विद्यापीठाच्या ३५ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे. येथील विलिंग्डन महाविद्यालयात तरुणाईचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. नृत्यापासून वक्तृत्व कलेपर्यंतच्या विविध स्पर्धेत यंग ब्रिगेड रमून गेली होती. येथे झालेल्या विविध स्पर्धांवर विलिंग्डन व केडब्ल्यूसी महाविद्यालयाने वर्चस्व मिळवले. महोत्सवाचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी किशोर पंडित होते. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियम सांगितले. प्राचार्य डॉ. बी. व्ही. ताम्हणकर यांनी स्वागत केले. डॉ. बी. व्ही. जेऊरकर यांनी संयोजन केले. यावेळी डॉ. डी. एस. मुंदगनूर, डॉ. एस. एस. सावंत, के. आर. दातार, आर. आर. वाडेकर, पी. व्ही. सावंत, ए. ए. टिकेकर, आर. पी. कागणे, जी. डी. शेळके, एस. व्ही. शृंगारे, पी. एच. दीक्षित उपस्थित होते. स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ अंतिम निकाल असा : लोकनृत्य : देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली, केडब्ल्यूसी सांगली, कन्या महाविद्यालय मिरज, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी. लावणी : मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय कडेगाव, विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा, जी. डी. लाड महाविद्यालय कुंडल. लोककला : मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगलीवाडी, श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी. लोकसंगीत वाद्यवृंद : देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली, आर्टस् अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज आष्टा, केडब्ल्यूसी सांगली. एकांकिका : केडब्ल्यूसी सांगली, न्यू लॉ कॉलेज सांगली, पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव, मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली. लघुनाटिका : विलिंग्डन महाविद्यालय सांगली, मालती वसंतदादा पाटील महाविद्यालय इस्लामपूर, पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव, केडब्ल्यूसी सांगली. पथनाट्य : जी. ए. कॉलेज आॅफ कॉमर्स सांगली, केडब्ल्यूसी सांगली, मिरज महाविद्यालय मिरज, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर. मूकनाट्य : राजारामबापू कॉलेज आॅफ शुगर टेक्नॉलॉजी इस्लामपूर, अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आष्टा, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय इस्लामपूर, पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव. भारतीय समूहगीत : केडब्ल्यूसी सांगली, विलिंग्डन महाविद्यालय सांगली, कला-वाणिज्य महाविद्यालय तासगाव, नानासाहेब महाडिक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग पेठ. समूह गायन : विलिंग्डन महाविद्यालय सांगली, केडब्ल्यूसी सांगली, राजारामबापू कॉलेज आॅफ शुगर टेक्नॉलॉजी इस्लामपूर, अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंंग आष्टा. वादविवाद : पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव, मालती वसंतदादा पाटील महाविद्यालय इस्लामपूर, देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली, बाबासाहेब चितळे महाविद्यालय भिलवडी. वक्तृत्व (इंग्रजी) : अण्णासाहेब डांगे कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आष्टा, राजे रामराव महाविद्यालय जत, केडब्ल्यूसी सांगली, मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली. वक्तृत्व (हिंदी) : देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय इस्लामपूर, पद्मभूषण वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगाव, मथुबाई गरवारे महाविद्यालय सांगली. वक्तृत्व (मराठी) : विश्वासराव नाईक महाविद्यालय शिराळा, विलिंग्डन महाविद्यालय सांगली, देशभक्त आनंदराव नाईक महाविद्यालय चिखली, केडब्ल्यूसी सांगली. विद्यापीठाचा मध्यवर्ती युवा महोत्सव ९ ते ११ सप्टेंबरदरम्यान कडेगाव येथील श्रीमती बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालयात होणार आहे. (वार्ताहर)ज्वलंत विषयांवर प्रकाशझोतस्पर्धेत एकूण ४५ महाविद्यालयांमधील तीनशे स्पर्धक सहभागी झाले होते. विलिंग्डन महाविद्यालयात महोत्सवासाठी एकूण चार रंगमंच तयार करण्यात आले होते. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पथनाट्याची व्यवस्था केली होती. स्पर्धेत ‘शेतकरी आत्महत्या, दाभोलकर व पानसरेंवरील भ्याड हल्ला’ अशा ज्वलंत विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. महोत्सव पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. तरूणाईचा सळसळता उत्साह महोत्सवाची शोभा वाढवत होता.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वावयावेळी बोलताना व्ही. एन शिंदे म्हणाले, या महोत्सवातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल. कलेच्या सादरीकरणातून प्रगतीची दिशा मिळते. नवोदित कलाकारांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता उत्स्फूर्तपणे सादरीकरण करावे.विविध स्पर्धांचे आयोजनमहोत्सवांतर्गत लोकनृत्य, लावणी, लोककला, लोकसंगीत वाद्यवृंद, एकांकिका, लघुनाटिका, पथनाट्य, मूकनाट्य, भारतीय समूहगीत, वादविवाद, वक्तृत्व (मराठी), वक्तृत्व (हिंदी), वक्तृत्व (इंग्रजी) अशा स्पर्धा घेण्यात आल्या.