शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धामोड प्राथमिक आरोग्य केंद्रच ऑक्सीजनवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 12:39 IST

धामणी परिसरातील ४०हुन अधिक गावांच्या रुग्णसेवेचा आधार असलेले धामोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच 'ऑक्सिजनवर ' असल्याचे चित्र आहे . परिणामी रुग्णांनाच येथे कर्मचारी कोण ? शोधण्याची वेळ आली आहे. त्यात भरीत भर म्हणजे या आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्र व आरोग्य केंद्रात 'चार ' कर्मचारी ही असे आहेत की, त्यांची निमुक्ती या ठिकाणी असून ते प्रत्यक्षात दुसऱ्याच आरोग्य केंद्राकडे काम करत आहेत . त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देधामोड प्राथमिक आरोग्य केंद्रच ऑक्सीजनवर !कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, कामाच्या वेळेत ही अनियमितता

श्रीकांत ऱ्हायकरतुळशी - धामणी परिसरातील ४०हुन अधिक गावांच्या रुग्णसेवेचा आधार असलेले धामोड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रच 'ऑक्सिजनवर ' असल्याचे चित्र आहे . परिणामी रुग्णांनाच येथे कर्मचारी कोण ? शोधण्याची वेळ आली आहे. त्यात भरीत भर म्हणजे या आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सात उपकेंद्र व आरोग्य केंद्रात 'चार ' कर्मचारी ही असे आहेत की, त्यांची निमुक्ती या ठिकाणी असून ते प्रत्यक्षात दुसऱ्याच आरोग्य केंद्राकडे काम करत आहेत . त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.धामोड प्राथमिक आरोग्य केंद्र हे राधानगरी तालुक्‍याच्या पश्‍चिम दुर्गम भागातील आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामध्ये सात उपकेंद्रांचा समावेश होतो. हे आरोग्य केंद्र या गावांसाठी रुग्णसेवेचा मोठा आधार आहे. पण असे असताना याठिकाणी दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असताना देखील एक वैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहे .सध्या तर प्रभारी वैद्यकीय अधिकाऱ्यावरच आरोग्य केंद्राचा कारभार सुरू आहे. पण जबाबदार अधिकारी नसल्याने कर्मचारी केंव्हाही ये जा करतात. कांही वेळेला तर कर्मचाऱ्याअभावी हा दवाखाना पूर्णपणे ओस पडलेला असतो.वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने कांही वेळा येथील ओपीडी पूर्णपणे बंद असते. बेशिस्त प्रशासनामुळे कर्मचाऱ्यांची मनमानी नित्याचिच बानली आहे . या सर्व गोष्टीच परिणाम म्हणून रुग्णानी या आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविली आहे. आज तर एक शिपाई व आरोग्य परिचारिका या दोन व्यक्तिंच्यावर येथील दिवसभराचे कामकाज सुरू होते. रुग्णांना योग्य उपचार मिळत नसल्याने रुग्ण येथील कारभाराबाबत पूर्णपणे नाराज आहेत. तसेच काही कर्मचाऱ्यांचे वाढत असलेली मनमानी ही बाह्य रुग्ण संख्या घटण्यासाठी कारणीभूत ठरत आहे.

 डोंगर कपाऱ्यातील वाडया -वस्त्यांसाठी हा दवाखाना आधारवड आहे . गेल्या दोन महिन्यापासून खरोखरच रुग्णांची मोठी हेळसांड होत असून जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून येथील वैद्यकिय सेवा पूर्ववत सुरू करावी- दिपक भामटेकर, ग्रामस्थ, धामोड

टॅग्स :hospitalहॉस्पिटलkolhapurकोल्हापूर