शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

चरण्याचे कुरण ठरविल्याने ‘धामणी’ रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 00:23 IST

संजय पारकर । लोकमत न्यूज नेटवर्क राधानगरी : राधानगरी तालुक्यातील धामणी धरणासाठी या भागातील रहिवाशांना गेली पंचवीस वर्षे फक्त ...

संजय पारकर ।लोकमत न्यूज नेटवर्कराधानगरी : राधानगरी तालुक्यातील धामणी धरणासाठी या भागातील रहिवाशांना गेली पंचवीस वर्षे फक्त आश्वासनावर झुलवत ठेवले जात आहे. पाण्यासाठी या लोकांना लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्रा घ्यावा लागला हे सरकारचे मोठे अपयश आहे. धरणाच्या कामावर यापूर्वी सुमारे ३00 कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे पैसे प्रत्यक्ष कामावर खर्च झाले असते तर कधीच येथे पाणी अडवले असते. मात्र, राजकीय नेते, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अशा प्रकल्पांकडे केवळ ‘चरण्याचे कुरण’ म्हणून पाहिल्याने अजूनही या प्रकल्पाचे काम रखडलेले आहे.२ एप्रिल १८९४ ला राज्यकारभार हाती घेतलेले शाहू महराज त्या काळात वारंवार पडणाºया दुष्काळामुळे व्यथित होत असत. १९०२ साली त्यांनी केलेल्या युरोपच्या दौºयात तेथील धरणांची पाहणी केली. त्यामुळे आपल्या संस्थानातही अशी धरणे बांधण्याची योजना आखली. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी त्यांनी संस्थानात स्वतंत्र पाटबंधारे विभाग निर्माण केला. त्यात आवश्यक मनुष्यबळ देऊन यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले. यावेळी भोगावती नदीवर फेजिवडे येथे व दुधगंगा नदीवर फराळे येथे धरणे बांधून त्यात पावसाचे पाणी अडवायचे व गरजेच्या वेळी ते नदीत सोडून ते पिण्याला व शेतीसाठी वापरायचे असे ठरविण्यात आले.९ लाख १० हजार लोकसंख्या व वार्षिक ४८.९७ लाख महसूल असलेल्या संस्थानात १४ नोव्हेंबर १९०९ ला भोगावती नदीवरील या धरणाच्या कामाला सुरुवात झाली. यासाठी मुंबई, कर्नाटक प्रांतांतून तज्ज्ञ लोक बोलावून घेतले. १९१८ पर्यंत ४० फूट उंचीचे धरण पूर्ण झाले तेव्हा त्यात ६०० दशलक्ष फूट पाणीसाठा होत असे. या कामात त्या काळात प्रचंड अडचणी होत्या. आर्थिक टंचाई असताना त्याकाळी यासाठी १४ लाख रुपये खर्च झाले. प्रसंगी महाराजांनी आपली स्वत:ची जमीन विकून पैसा उपलब्ध करण्याची तयारी केली होती. लोकांनी न मागताच स्वत:हून महाराजांनी हे सर्व काम केले होते.आजच्या लोकशाही राज्यात मात्र लोकांना याच तालुक्यातील धामणी येथे धरण होण्यासाठी अनेक वर्षे वाट पाहावी लागत आहे. या प्रकल्पाची ९ फेब्रुवारी २००५ ला सुधारित ३२० कोटी ७० लाखांच्या अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली. त्यापासून पुढे काही वर्षांत या कामावर २९३ कोटी ६४ लाख खर्च झाले आहेत. मात्र, पाणी साठेल असे काम झालेले नाही.नुकतीच याच्या तिसºया सुधारित ७८२ कोटी खर्चाच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. २३८ कोटी ७६ लाखांची फेरनिविदा निघाली आहे. मात्र, ती न्यायालयीन वादात अडकली आहे. त्यामुळे पुढील प्रक्रिया ठप्प झाली आहे. गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक ते मंत्रालयातील मोठे अधिकारी यांच्यापर्यंत कोणीच गांभीर्याने काम न केल्याने विविध अडचणी निर्माण झाल्या, तर काही निर्माण केल्या. यामुळे हा प्रकल्प रखडला. याकडे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील ३५ हजार मतदारांनी लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता. शासकीय यंत्रणेने सुरुवातीला याची दखल घेतली नाही.शेवटच्या टप्प्यात हालचाली करून ग्रामस्थांना यापासून परावृत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत झालेली फसवणूक लक्षात घेऊन ग्रामस्थ आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पंचवीस वर्षे आधी शिवसेना-भाजप, नंतर तीन वेळा कॉँग्रेस आघाडी व पाच वर्षांपासून पुन्हा भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत आहे. मात्र, हा प्रश्न काही सुटलेला नाही. या खोºयात हरितक्रांती होण्यासाठी व परिसर सुजलाम् सुफलाम् होण्यासाठी या धरणाचे काम लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.२१00 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल२४ डिसेंबर १९९६ ला मंजुरी मिळालेल्या या धरणाची मूळ किंमत १२० कोटी ३० लाखइतकी होती. प्रत्यक्षात २००० साली कामाला सुरुवात झाली. मात्र विविध अडचणींमुळे हे काम रेंगाळत गेले. परिणामी प्रकल्पाची किंमत वाढतच गेली. यातही ती किती वाढविली हा संशोधनाचा विषय आहे. ३.८४ टीएमसी क्षमतेचे हे धरण पूर्ण झाल्यावर राधानगरी ५८८, पन्हाळा ७६५ व गगनबावडा ७४७ असे २१०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. यातून मोठी हरित व औद्योगिक क्रांती होऊन सामाजिक बदल प्रचंड प्रमाणात होईल.