शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

‘धामणी’ची एकजूट; मतदानाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 01:10 IST

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेली १८ वर्र्षे रखडलेल्या मध्यम प्रकल्पासाठी धामणी खोऱ्यातील २५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...

म्हासुर्ली : राई (ता. राधानगरी) येथील गेली १८ वर्र्षे रखडलेल्या मध्यम प्रकल्पासाठी धामणी खोऱ्यातील २५ गावांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. पाणीदार गावांचा अपवाद वगळता उर्वरित गावांनी बहिष्कारास शंभर टक्के पाठिंबा दिला. ग्रामस्थांनी मतदानाकडे पाठ फिरवीत कामात व्यस्त राहणेच पसंत केले. एकाच प्रश्नासाठी सामुदायिकपणे मतदानावर बहिष्कार घालण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच वेळ आहे. या गावातील ११ हजार मतदान होऊ शकले नाही.स्वर्गीय यशवंत एकनाथ पाटील हे आमदार असल्यापासून धामणी प्रकल्पाचे काम रखडत आले आहे. शेतकऱ्यांच्या घशाला कोरड पडली असताना शासकीय यंत्रणेचे काम कासवगतीने सुरू आहे. प्रत्येक निवडणुकीत राज्यकर्ते प्रकल्प पूर्णत्वाचे आश्वासन द्यायचे, लोकांनी विश्वास ठेवून मतदान करायचे व पुन्हा ये रे माझ्या मागल्या, अशीच परिस्थिती राहिल्याने लोकसभा निवडणुकीपूर्वीच ४० गावे व वाड्यावस्त्यांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला होता.जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करूनही फारसा फरक पडला नाही. कृती समितीतील काहींनी बहिष्कार मागे घेतला; पण बहुतांश गावांत तो कायम राहिला. लढ्यास धामणी खोºयातील सर्व गावांनी पाठिंबा दिला. मात्र मतदानाच्या अगोदर काही तास कळे धरणातून बॅकवॉटरने पाणीपुरवठा होणाºया आकुर्डे, पणुत्रे, कोदवडे या गावांनी बहिष्कारास पाठिंबा देऊन मतदानात सहभागाचा निर्णय घेतला.धामणी धरणाच्या पायथ्याशी असणाºया चौके, मानबेट, राही, कंदलगाव व याअंतर्गत येणाºया वाड्यांनी या लढ्यापासून अलिप्त राहून मतदान केले. म्हासुर्ली, बाजारीवाडी, सावंतवाडी, गवशी, कोनोली; तर पन्हाळ्यातील बळीपवाडी, पणोरे, वेतवडे, आंबर्डे, हरपवडे, निवाचीवाडी ु गगनबावड्यातील धुंदवडे, खेरिवडे, केळोशी, जरगी, गारिवडे, आदी गावांत मतदानावर बहिष्कार टाकला.कर्मचारी बसून वैतागलेकर्मचारी सोमवारी (दि. २२) मतदानाचे साहित्य घेऊन मतदान केंद्रावर हजर झाले होते. मंगळवारी लवकर उठून सहा वाजता केंद्रावर सज्ज झाले; पण दिवसभर त्यांना मतदारांची प्रतीक्षाच करावी लागली. तब्बल अकरा तास कसे घालवयाचे, असा प्रश्न त्यांना होता. काहीजणांनी एकत्रित गप्पाटप्पा रंगविल्या, तर काहींनी मतदारांची वाट बघत बसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.फटका कोणाला?धामणी खोºयाचे कार्यक्षेत्र हे राधानगरी-भुदरगड व करवीर विधानसभा मतदारसंघात येते. त्यामुळे या बहिष्काराचा फटका कोणाला बसणार? कोणाच्या तरी जय-पराजयात हा बहिष्कार कारणीभूत ठरू शकतो, अशी चर्चा परिसरात आहे.