शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

कदमवाडीतील धैर्यशील पाटील ‘गेट’ परीक्षेत देशात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 11:32 IST

कदमवाडी (ता. करवीर) येथील धैर्यशील धनाजी पाटील याने ‘गेट २०१९’ परीक्षेत ८४.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. त्याने या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘गेट परीक्षा (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग)’ दि. ३ फेब्रुवारीला घेण्यात आली. त्याचा निकाल दि. १५ मार्चला आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये धैर्यशील याने १००० पैकी ९४५ गुण मिळविले.

ठळक मुद्देकदमवाडीतील धैर्यशील पाटील ‘गेट’ परीक्षेत देशात प्रथममेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये ८४.६७ गुण; नोकरी सांभाळून अभ्यास

कोल्हापूर : कदमवाडी (ता. करवीर) येथील धैर्यशील धनाजी पाटील याने ‘गेट २०१९’ परीक्षेत ८४.६७ टक्के गुणांसह बाजी मारली आहे. त्याने या परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीतर्फे ‘गेट परीक्षा (ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग)’ दि. ३ फेब्रुवारीला घेण्यात आली. त्याचा निकाल दि. १५ मार्चला आॅनलाईन जाहीर झाला. त्यामध्ये धैर्यशील याने १००० पैकी ९४५ गुण मिळविले.

या परीक्षेतील यशामुळे त्याला भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून काम करण्याची आणि बंगलोरमधील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्समध्ये पुढील पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. धैर्यशील याचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथील आबासाहेब गरवारे कॉलेजमध्ये झाले.

कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमधून त्याने मेटॅलार्जीकल इंजिनिअरिंगची पदवी जून २०१८ मध्ये घेतली. त्यानंतर सप्टेंबरमध्ये भिलाई (छत्तीसगड) येथील स्टील अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून तो रूजू झाला. सध्या या ठिकाणी काम करत त्याने गेट परीक्षेची तयारी केली.

स्वत:च्या नोट्सच्या जोरावर तयारी करून त्याने या परीक्षेत यश मिळविले आहे. त्याचे वडील धनाजी हे कोल्हापुरातील घाटगे-पाटील इंडस्ट्रीजमध्ये फिटर म्हणून काम करतात. आई संगीता या गृहिणी आहेत.

मटेरिअल सायन्समध्ये संशोधन करणारया परीक्षेत मेटॅलार्जीकल इंजिनिअरींगमध्ये देशात प्रथम क्रमांकाने यश मिळाल्याचा मला खूप आनंद होत आहे. यशासाठी मला आई-वडिलांचे मोठे पाठबळ लाभले. मटेरिअल सायन्समधील संशोधन क्षेत्रात मला करिअर करायचे आहे; त्यासाठी भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये रुजू होणार असल्याचे धैर्यशील याने सांगितले. 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूर