शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

देवगड हापूसला ‘जी. आय.’ मानांकन

By admin | Updated: April 20, 2017 22:49 IST

स्वतंत्र ब्रँड : पाच वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर मिळाला हिरवा कंदील

देवगड : देवगड हापूसला स्वत:ची ओळख प्राप्त होणारे ‘जी. आय.’ मानांकन मिळाले असून देवगड हापूसच्या नावावर आता अन्य कोणत्याही आंब्याची विक्री केली जाणार नाही. गेल्या पाच वर्षांच्या प्रयत्नांनंतर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केलेल्या जी. आय. मानांकनाच्या मागणीला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. जी. आय. मानांकनासाठी गुरुवारी मुंबई येथे सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली असून ‘देवगड हापूस’ हा स्वतंत्र ब्रॅण्ड निर्माण झाला आहे.हापूस आंब्याच्या जी. आय. मानांकनासाठी तीन अर्ज कंट्रोलर जनरल आॅफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे रत्नागिरी हापूस, दापोली कृषी विद्यापीठामार्फत हापूस व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने देवगड हापूस असे तीन अर्ज मानांकनासाठी दाखल करण्यात आले होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठामार्फत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील आंब्याला हापूस हे मानांकन देण्याबाबत अर्ज केला होता. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी देवगड हापूसला जी. आय. मानांकन मिळविण्यासाठी पाच वर्षे प्रयत्न सुरू ठेवले. देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे मार्केटिंग सल्लागार ओंकार सप्रे यांनी हे मानांकन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक, मद्रास व महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमधील आंबा विक्री केला जात होता. यामुळे देवगड हापूसची एकप्रकारे बदनामी होत होती. देवगड हापूस हा जगप्रसिद्ध आंबा असून, या आंब्याची चव व दर्जा देशात कुठल्याही आंब्याला नाही. त्यामुळे देवगड हापूसला चांगला भाव आहे. याचाच फायदा घेऊन कर्नाटकातील आंबा देवगड हापूसच्या नावाखाली विकून लोकांची दिशाभूल करून काही विक्रेते हे देवगड हापूससारख्या कर्नाटक आंब्याला भाव मिळवून घेत आहेत. देवगड हापूसला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे देवगड हापूसच्या नावाखाली केली जाणारी आंबा विक्री रोखली जाणार आहे. देवगड हापूसला आता देशाबाहेरही देवगड हापूस या नावानेच हा आंबा विकला जाणार आहे. (प्रतिनिधी)देवगड नाव वापरून दुसरा आंबा विकल्यास गुन्हादेवगड हापूस आंब्याला जी. आय. मानांकन मिळाल्यामुळे ग्राहकांना आता यापुढे खात्रीशीर देवगड हापूस आंबा उपलब्ध होणार आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूस व अन्य हापूस आंबे विक्री केले जात होते. याला आता आळा बसणार आहे. जी. आय. मानांकनामुळे विशिष्ट ब्रॅण्ड देवगड हापूसला असणार आहे. त्यामुळे ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.