शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 14:07 IST

कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकातून केली. पंधरवड्यापूर्वी मौन व अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा आपण दिलेला सल्लाही त्यांनी धुडकावल्याचे दिसते, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.

ठळक मुद्देउद्धव ठाकरे सर्वोत्कृष्ट ठरल्याचे देवेंद्र फडणवीस यांना खटकलेहसन मुश्रीफ यांची खोचक टीका : मौन, अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा सल्ला धुडकावल्याचे दिसते

कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काम सर्वोत्कृष्ट असल्याचे प्रसारमाध्यमांच्या चाचणीत स्पष्ट झाले, मात्र हीच गोष्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याची दिसते, अशी खोचक टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकातून केली. पंधरवड्यापूर्वी मौन व अध्यात्माची पुस्तके वाचण्याचा आपण दिलेला सल्लाही त्यांनी धुडकावल्याचे दिसते, अशी मिश्कील टिपणीही त्यांनी केली.काही दिवसांपूर्वी आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांना मौनम् सर्वार्थ साधनम्, मौन व्रतामुळे शांती लाभते आणि प्रतिकूल परिस्थितीत अध्यात्म हाच उपाय अशी तीन महत्त्वाची पुस्तके वाचण्याचा सल्ला आम्ही दिला होता. त्यांनी ती पुस्तके काही वाचलेली दिसत नसल्यानेच निसर्ग वादळाने नुकसान झालेल्या १०० कोटींच्या मदतीवर फडणवीस यांनी, राज्य सरकारची अवस्था पॉलिसी पॅरालिसिस नाही तर ॲक्शन पॅरालिसिससुद्धा आहे, अशी टीका केली.वास्तविक पंचनामे झाल्याशिवाय अशी मदत देता येत नसते; परंतु विजेचे ट्रान्स्फॉर्मर आणि जनतेच्या अत्यावश्यक सेवांसाठी तत्काळ मदत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०० कोटी रुपये तातडीने जाहीर केले. संपूर्ण जग कोरोनाविरोधात लढत आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महाराष्ट्रातील संकट नियंत्रणात आणले आहे. त्याचबरोबर गेल्या सहा महिन्यांतील कामाबद्दल प्रसारमाध्यमांनी केलेल्या चाचणीत देशातील पाच सर्वोत्कृष्ट मुख्यमंत्र्यांत उद्धव ठाकरे यांची गणना झाली, हेच देवेंद्र फडणवीस यांना खटकल्याचे दिसते. ज्या ज्यावेळी कोरोना संसर्गाचे रुग्ण कमी होतात किंवा मृत्यूचा आकडाही कमी असतो, त्यावेळी फडणवीस आकडे खोटे असल्याचे सांगण्यासाठी उसळून उठतात.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, चीन, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही सप्टेंबरपर्यंत कोरोनावर लस येणार असल्याचे जाहीर केले. या लसीमुळे कोरोना संपुष्टात आला तरी देवेंद्र फडणवीस काय म्हणतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपण सुचवलेली पुस्तके त्यांनी वाचली; तर वैफल्यग्रस्त मन:स्थितीतून ते बाहेर येतील आणि मनस्वास्थ्य ठीक होईल, असे मंत्री मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसkolhapurकोल्हापूर