शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटनवाढीसाठी पंचगंगा घाटाचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2018 00:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी पंचगंगा नदीघाट विकसित करणे आवश्यक असून, सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल; त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट ...

ठळक मुद्देचंद्रकात पाटील : पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन; २६ कोटींचा प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करणार

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पर्यटनवाढीसाठी पंचगंगा नदीघाट विकसित करणे आवश्यक असून, सुमारे २६ कोटी रुपयांचा हा संपूर्ण प्रकल्प येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्यात येईल; त्यामुळे हा परिसर शहरवासीयांसह पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनेल, अशी अपेक्षा पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी व्यक्त केली.सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत कोल्हापुरात पंचगंगा नदीघाट विकसित करण्याच्या योजनेचा भूमिपूजन समारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते.पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही ठिकाणे विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यटन वाढले तरच आपोआपच रोजगारही उपलब्ध होतील. हाच उद्देश ठेवून पंचगंगा घाट विकसित करण्यात येत असून, पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये खर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान करण्यात येत असून दोन वर्षांतच पंचगंगा घाट परिसर शहरवासीयांचे व पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र बनेल. सकाळी नदीवर पोहण्यासाठी येणाऱ्यांना चेंजिंग रूम्स आणि स्वच्छतागृहे बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापुरात मोठे उद्योगधंदे येण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्यामुळे किमान चार ते पाच हजार लोकांना कामधंदा मिळेल, असा आशावाद त्यांनी केला.पंचगंगा नदीचे प्रदूषण हा मोठा प्रश्न बनल्याने तो सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.शाहू छत्रपती यांनीही, घाट सुशोभीकरणासह शुद्धीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी आमदार अमल महाडिक, डॉ. सुजित मिणचेकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सदाशिव साळुंखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, नियोजन अधिकारी सरिता यादव, स्थायी समितीचे सभापती आशिष ढवळे, नगरसेवक विजय सूर्यवंशी, किरण शिराळे, किरण नकाते, रूपाराणी निकम, माधवी गवंडी, सरिता मोरे, आदी उपस्थित होते.पर्यटनवाढीसाठी दोन महिने सहलीचेजिल्ह्यात १५ एप्रिलपासून दोन महिने पर्यटन सहलींचे आयोजन केले असून, आठवड्यातून किमान दोन दिवस सहलींचे आयोजन केले आहे. सहभागी पर्यटकांची राहण्याची, भोजनाची, वाहनाची सोय केली जाईल. पर्यटकांना जिल्ह्यातील दुर्लक्षित आठ स्थळे दाखविण्यात येणार आहेत. राधानगरीत सुमारे आठ हजार फुलपाखरांची बाग विकसित करून पर्यटनवाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.पुरातन मंदिरेही विकसितपंचगंगा नदीपात्रात व परिसरात अनेक पुरातन मंदिरे, दीपमाळा असल्याने त्यांचीही डागडुजी करून त्याही सुशोभित करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशीही घोषणा पालकमंत्री पाटील यांनी केली.गावांनी सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करावेतमंत्री पाटील म्हणाले, पंचगंगेचे शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. पंचगंगा आणि रंकाळ्यात सांडपाणी मिसळणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत; तसेच पाळीव जनावरे धुण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करू. नदीकाठच्या गावांनीही प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी नदीत सोडण्याऐवजी गावातच सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प उभारावेत. त्यासाठी निधी देऊ, असेही आश्वासन त्यांनी दिले.