शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur- जोतिबा डोंगर विकासाचं 'चांगभलं': तिरुपतीच्या धर्तीवर विकास म्हणजे विस्थापनाची भीती

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: March 19, 2025 16:47 IST

जोतिबा ग्रामस्थांमध्ये संभ्रम : आम्हाला विश्वासात का घेत नाही हाच प्रश्न

इंदुमती गणेशकोल्हापूर : आमचा जोतिबा विकास प्राधिकरणाला विरोध नाही; पण विकास म्हणजे नेमके काय करणार हे स्पष्ट नाही. तिरुपतीच्या धर्तीवर म्हणजे डोंगरावरील गाव पायथ्याशी वसवणार का?, आम्हाला पर्यायी जागा देणार की घरे देणार? की नुकसानभरपाईची रक्कम देणार? आजवर जेवढे विकास प्रकल्प झाले. पाटबंधारे प्रकल्प झाले त्यापैकी एकाही प्रकल्पातील बाधितांना न्याय मिळालेला नाही मग आमचेही असेच होणार का? असे अनेक प्रश्न जोतिबा ग्रामस्थांमध्ये आहेत.पन्हाळ्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी पुढील पंधरा दिवसांत प्राधिकरणाची स्थापना करू हे जाहीर केल्यापासून जोतिबा डोंगरावरील रहिवाशांमध्ये गोंधळल्याचे वातावरण आहे. आमदार विनय कोरे यांनी या कार्यक्रमात एकाही माणसाचे विस्थापन न करता जोतिबा मंदिराचा विकास करण्याची ग्वाही दिली आहे. गेल्या दाेन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाच्या वतीने जोतिबा विकास आराखडा बनवला जात आहे, तो दोनवेळा शासनाला पाठवला गेला, त्रुटी दूर करण्यात आल्या; पण हे सगळं जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुरातत्त्व खाते, वास्तुविशारद अशा मोजक्या लोकांमध्येच फिरत आहे. वास्तवात तिथे राहणाऱ्या नागरिकांना तेथील भौगोलिक परिस्थितीची अधिक चांगली माहिती असताना आराखडा बनवताना त्यांना अजिबातच विश्वासात घेतले गेलेले नाही ही त्यांची मूळ तक्रार आहे. आम्ही सगळं वृत्तपत्रांतूनच वाचत आहोत. प्रत्यक्षात ग्रामपंचायत, देवाचे धार्मिक विधी करणारे गुरव व ग्रामस्थ आराखड्याबाबत अंधारात आहेत.सुंदर जोतिबा प्रकल्पातील कामे अपुरी राहिल्याने नवीन प्रश्न निर्माण झाले. असेच प्राधिकरणच्या बाबतीत झाले तर काय, याची चिंता आहे. विकास जरूर करा; पण आमच्या गरजा, प्रश्न आणि भौगोलिक स्थिती लक्षात घ्या एवढेच जोतिबा ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

समाधान करायला हवेतिरुपतीच्या धर्तीवर म्हणजे ग्रामस्थांना डोंगरावरून खालच्या गावांमध्ये विस्थापित व्हावे लागेल, याची भीती आहे. बरं स्थलांतर व्हायला पण काही हरकत नाही; पण याआधी झालेल्या सगळ्या प्रकल्पांचा बाधितांना वाईट अनुभव आहे. आमचेही तसेच झाले तर रस्त्यावर यावे लागेल, अशी शंका आहे. त्यांना प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हवी आहेत.

धार्मिक विधी कसे करणार?जोतिबावर ८० टक्के ग्रामस्थ हे देवाचे धार्मिक विधी करणारे गुरव आहेत. विस्थापित व्हावे लागले तरी त्यांची २ ते ३ किलोमीटर, डोंगराच्या पायथ्यालाच किंवा मंदिराच्या आवारातच काही खोल्या बांधून आठवडा असणाऱ्या गुरवांसाठी सुविधा निर्माण कराव्या लागतील. अन्यथा देवाच्या धार्मिक विधीत अडचणी येऊ शकतात.

जोतिबा डोंगराचा विकास व्हावा हीच आमची भावना आहे; पण प्रशासनाने आराखडा करताना ग्रामपंचायतीला व ग्रामस्थांना विश्वासात घेणे गरजेचे होते. अजूनही आम्हाला आराखड्यात नेमके काय आहे माहिती नाही. येथे स्वच्छता व पिण्याच्या पाण्याचा अभाव हे दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक व्हावी. ग्रामस्थांचा उदरनिर्वाह डोंगरावर अवलंबून आहे, त्याचा आराखड्यात विचार व्हावा. - राधा बुणे, माजी सरपंच

टॅग्स :kolhapurकोल्हापूरJyotiba Templeजोतिबा