शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
2
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
3
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
4
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
5
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
6
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
7
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
8
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
9
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
10
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
11
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
12
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
13
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
14
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
15
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
16
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
17
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
18
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
19
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
20
भाई, बाळासाहेबांबद्दल नेमके काय झाले होते, सांगता का..?

जंगल पर्यटनाची माहिती देणारे ‘भ्रमंती’ अ‍ॅप विकसित-राज्यातील पहिलीच प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 00:54 IST

कोल्हापूर : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पश्चिम घाटातील वन्यजिवांसह पक्ष्यांची माहिती जंगल पर्यटनातून पर्यटकांना मिळावी, यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक

ठळक मुद्देमुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांची संकल्पना

प्रवीण देसाई।कोल्हापूर : निसर्गसौंदर्याने नटलेल्या पश्चिम घाटातील वन्यजिवांसह पक्ष्यांची माहिती जंगल पर्यटनातून  पर्यटकांना मिळावी, यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. क्लेमेंट बेन यांच्या संकल्पनेतून ‘भ्रमंती’ अ‍ॅप ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामध्ये सह्याद्री  व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये जंगल पर्यटनासाठी विकसित करण ्यात आलेल्या भैरवगड, रामबन, वासोटा, जोळंबी या ‘ट्रेक’ची माहितीभरण्यात आली आहे. राज्यातील ही पहिलीच प्रणाली असून, यामध्ये आणखी ११ ‘ट्रेक’ची माहिती भरली जाणार आहे.

जंगल सफारी करायची म्हटले की, कर्नाटक, केरळच्या जंगलांमधील ‘ट्रेक’लाच कोल्हापूर विभागातील पर्यटकांची पसंती दिसते. पश्चिम घाटातील निसर्गसौंदर्यही त्याच तोडीचे आहे; परंतु अन्य राज्यांप्रमाणे ‘ट्रेक’ नसल्याने पश्चिम घाटाकडे जंगल पर्यटनाच्या दृष्टीने पर्यटकांचा ओढा कमी आहे. येथील निसर्गसौंदर्यासह वन्यजीव, पक्षी पर्यटकांना पाहता यावेत व त्यांना निसर्ग पर्यटनाचाआनंद लुटता यावा, यासाठी क्लेमेंट बेन यांनी ‘भ्रमंती’ अ‍ॅप प्रणालीची संकल्पना मांडून ती वनस्पतिशास्त्र तज्ज् ञ, जीवशास्त्रतज्ज्ञ, निसर्गतज्ज्ञ, भूगोलतज्ज्ञ, माहिती व तंत्रज्ञान तज्ज्ञांच्या मदतीने तयार केली.

या प्रणालीचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. १५ सप्टेंबर २०१७ रोजी केरळमधील पेरियार व्याघ्र प्रकल्प येथेही या संदर्भातील सादरीकरण करण्यात आले आहे. या अ‍ॅपचे काम पूर्ण होऊन त्यामध्ये पश्चिम घाटातील एकूण मंजूर झालेल्या १५ ट्रॅकपैकी पहिल्या टप्प्यात भैरवगड, रामबन, वासोटा (जि. सातारा) व जोळंबी (जि. सांगली)या चार ‘ट्रेक’ची माहिती भरण्यात आली आहे. वर्षभरात टप्प्याटप्प्याने उर्वरित ‘ट्रेक’ची माहिती भरली जाणार आहे.‘ट्रेक’म्हणजे काय?सह्याद्री व्याघ्रप्रकल्पातील बफर झोनमध्य ‘ट्रेक’े सरासरी ३ ते १५ किलोमीटरपर्यंत क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. पर्यटकांना अत्यंत सुरक्षित व जंगल पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेता यावा, तसेच पश्चिम घाट पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित होऊन येथील स्थानिक लोकांना उत्पन्न मिळावे व येथील शिकारीचे प्रकार थांबावेत, या दृष्टीने ‘ट्रेक’च्या माध्यमातून सरकारकडून पाऊल उचलण्यात आले आहे.‘ट्रेक’ना कृषी पर्यटनमधून निधीपश्चिम घाटातील १५ ट्रेकना केंद्रीय वनमंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. यासाठी महाराष्टÑ शासनाच्या कृषी पर्यटन महामंडळाच्या माध्यमातून निधी दिला जाणार आहे. प्रत्येक ‘ट्रेक’साठी अंदाजे सरासरी १० लाख रुपये खर्च येणार आहे.‘भ्रमंती’मधून पारदर्शकता‘भ्रमंती’अ‍ॅप मधून पर्यटकाला संबंधित ‘ट्रेक’चे बुकिंग आॅनलाईनद्वारे करता येणार आहे. बुकिंग केल्यानंतर याचा मेसेज मुख्य वनसंरक्षक व स्थानिक ग्रामस्तरीय विकास समितीच्या अध्यक्षांना जाणार आहे. यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा निम्मा भाग हा व्याघ्र फौंडेशन व निम्मा भाग हा ग्रामस्तरीय विकास समितीला मिळणार आहे. 

पर्यटकांना जंगल पर्यटन ट्रेकची संपूर्ण माहिती मिळावी तसेच आॅनलाईनद्वारे बुकिंग करता यावे यासाठी ‘भ्रमंती’ अ‍ॅपची निर्मिती केली आहे. पहिल्या टप्प्यात चार ‘ट्रेक’ची माहिती दिली असून, उर्वरित ‘ट्रेक’ची माहिती टप्प्याटप्प्याने भरली जाणार आहे.- डॉ. क्लेमेंट बेन, मुख्य वनसंरक्षक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूर विभाग