शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटन, सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 00:20 IST

कोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे.

ठळक मुद्दे संभाजीराजे; जैसलमेर येथे आयोजित कार्यक्रमात सर्व राज्यांना आवाहनअनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या.

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारसा स्थळे व पर्यटन यांचा अत्यंत निकटचा संबंध आहे. लाखो पर्यटकांना आकर्षित करून घेण्याची क्षमता भारताच्या प्राचीन, सांस्कृतिक पर्यटन स्थळांत आहे. त्याअर्थाने वारसा स्थळे अर्थव्यवस्थेतील महत्त्वाची घटक होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक राज्यांनी सांस्कृतिक वारसा धोरण विकसित करायला हवे आणि आपापल्या राज्यातील वारसा स्थळांची उत्तम देखभाल करावी, असे आवाहन खासदार संभाजीराजे यांनी शनिवारी केले.जैसलमेर (राजस्थान) येथे इंडिया हेरिटेज हॉटेल असोसिएशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाराज गजसिंह होते.संभाजीराजे म्हणाले, पर्यटकांना जर आकर्षित केले तर लाखो कुटुंबांना स्थानिक पातळीवर उत्तम रोजगार उपलब्ध होऊ शकतो आणि यामधून अनेक आर्थिक स्वरूपाचे फायदे सर्वांना होऊ शकतात.

आपण आपला वारसा जतन करा, तो पर्यटकांना दाखवा आणि त्यायोग्य स्वत:चा विकास घडवून घ्या.ते पुढे म्हणाले, सर्व राज्यांनी पुढाकार घेऊन धोरण आखले तर पर्यटन क्षेत्राचा उपयोग आपल्याला करता येईल. या संदर्भात देशातील अनेक राजघराण्यांनी आपल्याकडील ऐतिहासिक वास्तू सर्वसामान्यांसाठी खुल्या केल्या. त्यानंतर पर्यटक आले व त्यातून रोजगार मिळाला यासाठी राजघराण्यांनी प्रयत्न केले ते उल्लेखनीय आहेत. वारसा स्थळांचा भूतकाळ ऐतिहासिक आहे. संपूर्ण देशभरात लाखो पर्यटकांना ही स्थळे आकर्षित करतात. या वारसा वास्तू आपल्याला भविष्यातील पिढीपर्यंत पोहोचवाव्या लागतील.अंतिम उद्देश सामाजिक सुधारणा हाच पाहिजेमराठ्यांना लष्करी यश मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक सुधारणांच्या कार्यात झोकून दिले. छत्रपती शिवाजी महाराज ते राजर्षी शाहू महाराज यांचा प्रवास हेच दर्शवितो. आपल्या सर्वांचा अंतिम उद्देश, आर्थिकहित व सामाजिक सुधारणांचा असला पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.