शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देवस्थान जमीन गैरव्यवहार; नामदेव कुंभारकडे चौकशी

By admin | Updated: July 24, 2016 00:37 IST

सदस्य, कर्मचाऱ्यांवर संशय : सह्यांचे नमुने पुण्याला पाठविणार

कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या शेतजमीन गैरव्यवहारामध्ये सचिव व सदस्यांच्या बोगस सह्यांद्वारे कागदपत्रे तयार करून शाहूवाडी तालुक्यातील उदगिरी येथील एक हजार एकर शेतजमीन लाटण्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी थंडावलेल्या चौकशीला पुन्हा गती देत पेठवडगाव येथील एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स या कंपनीचा मालक नामदेव कुंभार याच्याकडे शनिवारी कसून चौकशी केली. या गैरव्यवहारामध्ये काही समिती सदस्यांसह कर्मचाऱ्यांचा हात आहे. अशा संशयितांचे सह्यांचे नमुने घेतले असून ते उद्या, सोमवारी पुणे येथील ‘फॉरेन्सिक लॅब’ला पाठविण्यात येतील. त्याचा अहवाल प्राप्त होताच ‘त्या’ दोन कंपन्यांच्या मालकांसह दोषींना अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले जाईल, अशी माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांनी ‘लोकमत’ला दिली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे पश्चिम महाराष्ट्रातील २५ हजार एकर शेतजमीन आहे. त्यापैकी देवस्थानची शाहूवाडीत साडेचार हजार एकर शेतजमीन आहे. ‘सीआयडी’च्या भूखंड गैरव्यवहार चौकशीमध्ये शाहूवाडीपासून २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उदगिरी येथील हजार एकर शेतजमीन देवस्थानच्या सचिव शुभांगी साठे यांच्यासह समिती सदस्यांच्या समितीच्या लेटरपॅडवर बोगस सह्या व शिक्के मारून मुंबई व पेठवडगाव येथील दोन कंपन्यांच्या नावे चढविण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी देवस्थानचे कर्मचारी शिवाजी साळवी यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने दोन कंपन्यांसह अज्ञात व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. हा गैरव्यवहार दि. १६ आॅगस्ट २०१२ ते ३१ आॅगस्ट २०१५ या मुदतीत देवस्थान व्यवस्थापन समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात घडला आहे. त्या कालावधीत समिती बोर्डावर असणाऱ्या सदस्य व कर्मचाऱ्यांपैकीच काहीजणांनी हे धाडस केल्याची शक्यता पोलिसांना वाटते आहे. पोलिसांनी आतापर्यंत गुन्ह्यांशी संबंधित असणाऱ्या समिती सदस्य व कर्मचारी अशा पंधराजणांचे जबाब नोंदविले आहेत. शनिवारी पेठवडगाव येथील एन. एस. कुंभार याला चौकशीसाठी बोलावून घेतले होते. त्यांपैकी चार-पाच सदस्य व कर्मचारी संशयित आहेत. आणखी काहीजणांवर संशय असून त्यांच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे देशमुख यांनी सांगितले.खनिज साठ्यासाठी ‘कारभाऱ्यांची फिल्डिंग उदगिरी येथे खनिज साठा मोठ्या प्रमाणात आहे. भविष्यात उत्खनन करून त्याचा फायदा उठविण्यासाठी देवस्थानची हजारो एकर जमीन ‘त्या’ दोन कंपन्यांच्या नावाखाली लाटण्याचा प्रयत्न समितीमधील काही मातब्बर सदस्य करीत आहेत. पोलिसांनी नामदेवकडे चौकशी केल्यानंतर या गैरव्यवहारातील पडद्यामागचे ‘कारभारी’ उजेडात येणार आहेत. कोण हा एन. एस. कुंभार ऊर्फ नामदेव? देवस्थान समिती शेतजमीन गैरव्यवहारात एन. एस. कुंभार ट्रेडर्स अँड मिनरल्स, पेठवडगाव या कंपनीचा सहभाग असल्याचे स्पष्ट होताच पेठवडगावमध्ये खळबळ माजली. या कंपनीचा मालक नामदेव कुंभार याचा पारंपरिक व्यवसाय कुंभारकीचा आहे. १९८८ मध्ये तत्कालीन गृहराज्यमंत्री शिवाजीराव देशमुख यांच्या नावाखाली तो शासकीय जमिनी नावावर चढविण्याची कामे घेत होता. त्यामुळे त्याचा जमीन खरेदी-विक्री व्यवसायात हातखंडा आहे. काही वर्षांपूर्वी त्याने पेठवडगाव येथील बोगस धनादेशाद्वारे ‘महालक्ष्मी’ सिनेमागृह खरेदी करून शिक्षकाची फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात न्यायालयात खटला सुरू आहे. तो महिन्यातून एक-दोन वेळाच घरी येतो. याठिकाणी त्याची पत्नी, मुलगा, सून राहण्यास आहे. व्यवसायाने कुंभार आणि दोन खोल्यांच्या साध्या घरात राहणारा नामदेव हा स्वत:च्या नावे ट्रेडर्स अँड मिनरल्स कंपनी काढून उदगिरी येथील देवस्थानची हजारो एकर जमीन लाटण्याचा प्रयत्न करतो, यासंबंधी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.देवस्थान समिती शेतजमीन गैरव्यवहार प्रकरण गंभीर आहे. त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही. आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. - अनिल देशमुख, पोलिस निरीक्षक, जुना राजवाडा