शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांच्या कार्यालयावर देवदासींचा धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 18:37 IST

गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही देवदासींनी यावेळी दिला.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या कार्यालयावर देवदासींचा धडक मोर्चापेन्शनची मागणी प्रलंबित : सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

कोल्हापूर : गेल्या पंचवीस वर्षांपासून पेन्शनसह न्याय्य मागण्यांसाठी देवदासी रस्त्यांवर उतरून सरकारकडे पाठपुरावा करत आहेत; परंतु त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी देवदासींनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कावळा नाका येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. निवडणुकीपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशाराही देवदासींनी यावेळी दिला.दुपारी एकच्या सुमारास सदर बाजार येथून माजी नगरसेवक अशोक भंडारे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. देवदासी, वाघ्या मुरळी यांनी हातात सुती चवंडके, हालगी, ढोल, दिमडी, ढोलक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरात व रेणुका-यल्लमांच्या नावाचा जागर करत मोर्चा काढला.‘देवदासींचा पेन्शन प्रस्ताव त्वरीत मंजूर करा’, ‘देवदासींनी विविध शासकीय योजनांचा लाभ द्या’ असे फलक लक्ष वेधत होते.मागण्यांचे निवेदन पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बी. बी. यादव यांना सादर करण्यात आले. गेल्या दोन वर्षांमध्ये देवदासींच्या मागण्या मंजूर करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांच्या प्रमुखांसोबत तीनवेळा बैठक घेतली; परंतु त्यातून आश्वासनांशिवाय काहीच निष्पन्न झाले नसल्याचे सांगण्यात आले.

आंदोलनात माजी नगरसेविका मायादेवी भंडारे, देवताई साळोखे, रेखा वडर, द्रौपदी सातपुते, नसीम देवडी,यल्लवा कांबळे, शांताबाई पाटील, शारदा अवघडे, लक्ष्मी साठे, छाया चित्रुक, पंकज भंडारे, रेणुका वाघमारे, पिराजी कांबळे आदींसह महिला सहभागी झाल्या.

 

 

टॅग्स :Morchaमोर्चाkolhapurकोल्हापूर